शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 18:20 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राच्या आईला खास पत्र लिहिले.

neeraj chopra olympics 2024 : सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. नीरजच्या या यशानंतर त्याचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजच्या आईसाठी एक खास पत्र लिहिले. मोदींनी पत्राद्वारे म्हटले की, सरोज देवी जी, तुम्ही निरोगी आणि आनंदी असाल अशी आशा आहे. काल मला जमैकाच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नीरजला भेटण्याची संधी मिळाली. या चर्चेदरम्यान त्याने मला तुमच्या हाताने बनवलेला स्वादिष्ट चुरमा दिल्याने खूप आनंद झाला. हा चुरमा खाल्ल्यानंतर तुम्हाला पत्र लिहिण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही. नीरज अनेकदा माझ्याशी या चुरमाविषयी बोलत असतो, पण आज तो खाऊन मी भावुक झालो. तुमच्या या अपार काळजी आणि आपुलकीमुळे मला माझ्या आईची आठवण आली.  

मोदी यांनी पुढे लिहिले की, आई ही शक्ती, आपुलकी आणि समर्पणाचे रुप असते. नवरात्रोत्सवाच्या एक दिवस आधी हा प्रसाद मला आईकडून मिळाला हा योगायोगच आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांत मी उपवास करतो. एकप्रकारे तुमचा हा चुरमा माझ्या उपवासाच्या आधी माझा मुख्य आहार बनला आहे. तुम्ही बनवलेले जेवण नीरज भाऊला देशासाठी पदक जिंकण्याची ऊर्जा देते. तसेच हा चुरमा मला पुढील ९ दिवस देशसेवेचे बळ देईल. या शक्तीपर्व नवरात्रीच्या निमित्ताने, मी तुमच्यासह देशाच्या मातृशक्तीला आश्वासन देतो की, विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी मी अधिक सेवेच्या भावनेने काम करत राहीन. आपले मनःपूर्वक आभार. 

दरम्यान, नीरज चोप्राच्या सोनेरी कामगिरीमुळे भालाफेक या खेळाची भारतातील कानाकोपऱ्यात माहिती पोहोचली. ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत सलग दोनवेळा नीरजने पदक जिंकण्याची किमया साधली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये तो दुखापतग्रस्त असताना देखील सहभागी झाला. पण, यावेळी त्याला सुवर्ण नाहीतर रौप्य जिंकण्यात यश आले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऐतिहासिक कामगिरी करुन सुवर्ण पदक पटकावले. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राNarendra Modiनरेंद्र मोदी