नवी दिल्ली : गोव्यात ५ ते १५ आक्टोबरदरम्यान होणाऱ्या पाच देशांच्या ‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या चषकाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले. ही स्पर्धा १७ वर्षांखालील गटाची आहे. पंतप्रधानांनी चषकाच्या अनावरणप्रसंगी सहभागी देशांना शुभेच्छा दिल्या. या वेळी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि ब्रिक्स देशांचे राजदूत उपस्थित होते. पंतप्रधानांच्या हस्ते यापूर्वीच स्पर्धेच्या ‘रोल आॅफ ट्रॉफी’चे अनावरण करण्यात आले होते. या स्पर्धेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. मोदी म्हणाले, ब्रिक्स स्पर्धा आपले लक्ष्य गाठण्यात यशस्वी होईल. या स्पर्धेत सहभागी होणारे देश हे मैत्री आणि त्यांची समज अधिक वाढवणार आहेत.(वृत्तसंस्था)
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ब्रिक्स चषकाचे अनावरण
By admin | Updated: October 2, 2016 00:32 IST