शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

दडपण जोकोव्हीचवर : नदाल

By admin | Updated: June 3, 2015 00:29 IST

रोला गॅरोचा बादशाह व फ्रेंच ओपनमध्ये नऊ वेळा जेतेपदाचा मान मिळविणार राफेल नदाल व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हीच

पॅरिस : रोला गॅरोचा बादशाह व फ्रेंच ओपनमध्ये नऊ वेळा जेतेपदाचा मान मिळविणार राफेल नदाल व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हीच यांच्यादरम्यान बुधवारी खेळल्या जाणारी उपांत्यपूर्व फेरीची लढत चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे, पण स्पेनिश खेळाडूच्या मते त्याच्यासाठी ही एक सामन्य लढत आहे. वर्षातील दुसरी ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा पुढे सरकत असताना रंगत अधिक वाढत आहे. नऊ वेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या नदालने बुधवारच्या लढतीबाबत दडपण नसल्याचे स्पष्ट करताना सर्व दडपण अव्वल मानांकित जोकोव्हिचवर राहणार असल्याचे म्हटले आहे. नदालने यापूर्वी रोला गॅरोवर जोकोव्हिचविरुद्ध सहावेळा विजय मिळविला आहे. स्पेनच्या या स्टार खेळाडूने फ्रेंच ओपनमध्ये विक्रमी ७० सामने जिंकले असून केवळ एक लढत गमावली आहे. जोकोव्हिचविरुद्ध नदालने गेल्या तीन वर्षांत २०१२ व २०१४ च्या अंतिम लढतींसह २०१३ च्या उपांत्य फेरीत विजय मिळवला होता. जोकोव्हिचविरुद्धच्या लढतीबाबत बोलताना नदाल म्हणाला,‘माझ्यासाठी ही एक सामन्य लढत आहे. जर ही लढत जेतेपदासाठी असती तर वेगळी बाब असती पण, ही उपांत्यपूर्व फेरीची लढत असून यात सरशी साधणाऱ्या खेळाडूला उपांत्य फेरी गाठता येईल. गेल्या वर्षी अंतिम लढतीत जोकोव्हिचचा पराभव केला होता. यंदाच्या मोसमात मी त्याच्याविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळत आहे. या लढतीत पराभव स्वीकारावा लागला तरी माझ्या जीवनात विशेष फरक पडणार नाही.’चारही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न बघणाऱ्या जोकोव्हिचबाबत बोलताना नदाल म्हणाला,‘माझी स्थिती जोकोव्हिचच्या तुलनेत वेगळी आहे. मला जर पराभव स्वीकारावा लागला तर मी पुढच्या स्पर्धेच्या तयारीला प्रारंभ करणार आहे, पण जोकोव्हिचने विजय मिळवला तर तो चारही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत जेतेपद पटकावण्याच्या स्वप्नासह पुढे वाटचाल करणार आहे.’(वृत्तसंस्था)