शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हॉकीची लोकप्रियता वाढविण्यास प्राधान्य

By admin | Updated: November 16, 2016 00:04 IST

हॉकीची लोकप्रियता वाढविण्यासह या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यावर भर देणार असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे पहिले बिगर

नवी दिल्ली : हॉकीची लोकप्रियता वाढविण्यासह या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यावर भर देणार असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे पहिले बिगर युरोपियन अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी सांगितले. १० वर्षांच्या हॉकी क्रांती रणनीतीवर लक्ष असून त्याची सुरुवात २०१९ मध्ये होणार आहे, असेही बत्रा म्हणाले. बत्रा यांनी सांगितले, ‘हॉकी क्रांती कार्यक्रमानुसार एफआयएच ९ आंतरराष्ट्रीय संघांदरम्यान ‘होम अ‍ॅण्ड अवे’ लीगला सुरुवात करणार आहे. या लीगच्या आधारावरच आॅलिम्पिक आणि विश्वकप पात्रतेचे निकष ठरतील.’एफआयएचच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना बत्रा म्हणाले, ‘मी हॉकीसाठी योगदान देण्यास इच्छुक असून, या खेळाला लोकप्रिय करण्यास प्रयत्नशील आहे. या योजनेनुसार एफआयएच २०१९ पासून १० वर्षांसाठी हॉकी रिव्होल्युशन कार्यक्रम राबविणार आहे. पुढच्या पिढीला या खेळाकडे आकर्षित करण्याचा मुख्य उद्देश आहे. २०१९ मध्ये आपल्याला वर्षभर हॉकी बघता येईल. आम्ही नवी लीग प्रारंभ करणार असून ती महत्त्वाची ठरणार आहे. या ‘होम अ‍ॅण्ड अवे’ लीगमध्ये ९ देश सहभागी होतील. ही लीग म्हणजेच आॅलिम्पिक पात्रता व विश्वकप क्वॉलीफायर असेल. लीगमधील अव्वल दोन संघ आॅलिम्पिक व विश्वकपसाठी पात्र ठरतील. लीगचे आयोजन सहा महिने कालावधीचे राहणार असून शनिवारी व रविवारी सामने होतील.’बत्रा पुढे म्हणाले, ‘आम्ही पाकसारख्या संघांसाठी तटस्थ स्थळांचा पर्याय ठेवला आहे, पण संघाने खेळण्याची तयारी दर्शवायला हवी. हॉकीचे क्षेत्र व महसूल वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे. हॉकीचा आफ्रिका, पेन अमेरिका, ओशियाना व आशिया या विभागात विकास करण्याचे माझे मुख्य काम राहील. मी आंतरराष्ट्रीय हॉकी संघांच्या संख्येत वाढ करण्यास प्रयत्नशील आहे. भविष्यात संघांची संख्या १०-१२ पासून वाढून २०-२५ करण्यास मी इच्छुक आहे.’ (वृत्तसंस्था)