शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

प्रणीतचे पहिलेच सुपर सिरीज विजेतेपद

By admin | Updated: April 17, 2017 01:21 IST

उदयोन्मुख भारतीय बॅडमिंटनपटू बी. साई प्रणीतने रविवारी सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत मायदेशातील सहकारी किदाम्बी श्रीकांतचा पराभव करीत कारकिर्दीत प्रथमच सुपर सिरीज स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला

सिंगापूर : उदयोन्मुख भारतीय बॅडमिंटनपटू बी. साई प्रणीतने रविवारी सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत मायदेशातील सहकारी किदाम्बी श्रीकांतचा पराभव करीत कारकिर्दीत प्रथमच सुपर सिरीज स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असलेल्या प्रणीतने श्रीकांतचा ५४ मिनिटांमध्ये १७-२१, २१-१७, २१-१२ ने पराभव केला. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनच्या इतिहासात प्रथम दोन भारतीय खेळाडूंदरम्यान सुपर सिरीजची अंतिम लढत रंगली. ही लढत चुरशीची झाली. गोपीचंद अकादमीमध्ये नियमित सराव करणाऱ्या या दोन खेळाडूंना एकमेकांच्या खेळाची चांगली माहिती होती. उभय खेळाडू एकमेकांविरुद्ध सरशी साधण्यास प्रयत्नशील होते. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने अचूक स्मॅशच्या जोरावर गुण वसूल केले. त्याने प्रणीतच्या फोरहँड शॉटवर शानदार रिटर्नच्या आधारावरही वर्चस्व गाजवले. प्रणीतने त्यानंतर संघर्षपूर्ण खेळ करीत १४-१५ अशी पिछाडी भरून काढली, पण श्रीकांतने वर्चस्व कायम राखताना पहिला गेम जिंकत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने सुरुवातीला ४-१ अशी आघाडी घेतली होती, पण प्रणीतने पुनरागमन करीत ७-७ अशी बरोबरी साधली. प्रणीतने त्यानंतर ११-१० अशी आघाडी मिळवली. प्रणीत वर्चस्व गाजवत असताना श्रीकांतने सर्व्हिसमध्ये चूक केली. त्यामुळे प्रणीतने २०-१७ अशी आघाडी घेतली. श्रीकांतने एक चुकीचा फटका खेळल्यामुळे प्रणीतने लढतीत १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये प्रणीतने लय कायम राखताना सुरुवातीला ७-३ अशी व ब्रेकपर्यंत ११-५ अशी दमदार आघाडी घेतली होती. प्रणीतने वर्चस्व कायम राखताना १९-१२ अशी आघाडी घेतली होती. श्रीकांतने चुकीचा फटका खेळल्यामुळे प्रणीतला मॅच पॉर्इंट मिळाला. श्रीकांतने पुन्हा एक चूक केल्यामुळे प्रणीतच्या पहिला सुपर सिरीज विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. २०१० मध्ये विश्व ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावल्यानंतर प्रणीतने काही दिग्गज बॅडमिंटनपटूंचा पराभव केला होता. त्यात मलेशियाचा माजी आॅल इंग्लंड चॅम्पियन मोहम्मद हफीज हाशिम, माजी आॅलिम्पिक व विश्वचॅम्पियन तौफिक हिदायत आणि जागतिक क्रमवारीतील नंबर वन ली चोंग वेई यांचा समावेश आहे. यापूर्वी प्रणीतला दुखापतीमुळे सुपर सिरीजच्या सुरुवातीच्या फेरीमध्येच गाशा गुंडाळावा लागला होता, पण गेल्या वर्षी कॅनडामध्ये जेतेपद पटकावल्यानंतर परिस्थितीमध्ये बदल झाला. गेल्या वर्षी कॅनडा ओपन ग्रांप्री व यंदा सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धा जिंकणाऱ्या विजेतेपदानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘ज्या खेळाडूविरुद्ध रोज खेळतो त्याच्याविरुद्ध खेळणे नेहमीच कठीण असते. आजच्या विजयामुळे खूश आहे. स्पर्धेतील कामगिरीबाबत समाधानी आहे. येथे भारतीय खेळाडूंना चांगला पाठिंबा मिळाला.’’