शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रणीत, प्रणय यांची आगेकूच

By admin | Updated: July 1, 2016 05:02 IST

भारताचा अजय जयराम, दुसरा मानांकित एच. एस. प्रणोय आणि चौथा मानांकित बी. साई प्रणीत यांनी पुरुष एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

कॅलगेरी : भारताचा अजय जयराम, दुसरा मानांकित एच. एस. प्रणोय आणि चौथा मानांकित बी. साई प्रणीत यांनी पुरुष एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत अग्रमानांकन असलेल्या अजय जयरामने दुसऱ्या फेरीत कॅनडाच्या मार्टिन गियूफरेचा ५४ मिनिटांत १७-२१, २१-१७, २१-१३ गुणांनी पराभव केला. जागतिक क्रमवारीत २४व्या क्रमांकावर असलेल्या जयरामला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी आॅस्ट्रियाच्या डेव्हिड ओबेमोस्टेरेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जागतिक मानांकनात २८ व्या क्रमांकावर असलेल्या प्रणोयने स्विडनच्या माथियस बोर्जला ५७ मिनिटांत १३-२१, २१-११, २१-१५ गुणांनी नमविले. प्रणयचा पुढील सामना कॅनडाच्या बी. आर. संकिर्थविरुद्ध होईल. तिसऱ्या सामन्यात चौथा मानांकित बी. साई प्रणीतने चिनी ताईपैच्या कान चाओ यू ला ४० मिनिटांत २६-२४, २१-१६ गुणांनी नमवित पुढच्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत ३७ व्या क्रमांकावर असलेल्या प्रणीतची पुढील लढत वेनचाओ शी याच्या विरुद्ध होणार आहे. इतर सामन्यांमध्ये भारताच्या प्रतुल जोशीने स्कॉटलंडच्या एलिस्टेयर कासीला ३० मिनिटांत २१-१३, २१-१२ असे पराभूत केले. दुसरीकडे भारताच्या हर्षल दाणींना पुढे चाल मिळाली आहे. आरएमव्ही गुरुसाईदत्तने कॅनडाच्या जोनाथन लाईला अवघ्या २० मिनिटांत २१-८, २१-६ गुणांनी नमवित आपले विजयी अभियान सुरू ठेवले. (वृत्तसंस्था) महिला गटात भारताच्या तन्वी लाडने डेन्मार्कच्या जूली फिनइपस्त्रचा २१-१७, २१-१० गुणांनी ३० मिनिटात फडशा पाडून पुढची फेरी गाठली. दुसरीकडे रुत्विका शिवानीने कॅनडाच्या काइली ओ डोनोगुयला २१-१४, २१-१४ असे पराभूत केले. मिश्र दुहेरीत मनु अत्री व अश्विनी पोनप्पाने कॅनडाची बाइरोन होलचेक व इरिन ओ डोंगहुये या जोडीला १८ मिनिटांत २१-१३, २१-१४ असे पराभूत करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.