शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

प्रणयने दिला आॅलिम्पिक चॅम्पियनला धक्का

By admin | Updated: October 22, 2015 01:03 IST

भारताच्या एच. एस. प्रणय याने फ्रेंच ओपन स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद करताना चीनच्या लिन डैन या आॅलिम्पिक चॅम्पियनला नमवले. त्याचवेळी

पॅरीस : भारताच्या एच. एस. प्रणय याने फ्रेंच ओपन स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद करताना चीनच्या लिन डैन या आॅलिम्पिक चॅम्पियनला नमवले. त्याचवेळी जागतिक बॅडमिंटनमधील अव्वल महिला खेळाडू सायना नेहवालने शानदार विजयी सलामी दिली. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेत्या पारुपल्ली कश्यपनेही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी पाचव्या मानांकीत के. श्रीकांत याचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.पुरुष एकेरीमध्ये बिगरमानांकीत प्रणयने अनपेक्षित निकाल लावताना तृतीय मानांकीत डैनला धक्का देत खळबळ माजवली. तीन सेटपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतरही त्याने कडवी झुंज देत सलग दोन सेटमध्ये बाजी मारुन १४-२१, २१-११, २१-१७ असा सनसनाटी विजय मिळवला. महिला गटात अव्वल खेळाडू सायनाने कॅनडाच्या मिशेल ली हिचा ४२ मिनीटांपर्यंत रंगलेल्या एकतर्फी सामन्यात २१-१८, २१-१३ असा धुव्वा उडवला. पहिल्या सेटमध्ये मिशेलने अनुभवी सायना कडवी झुंज दिली खरी, मात्र यानंतर सायनाने आपला हिसका दाखवताना सहज बाजी मारली. पहिल्या सेटमध्ये एकवेळ मिशेल ७-३ अशी आघाडीवर होती.आठव्या मानांकीत कश्यपनेही सामन्यात एकहाती वर्चस्व राखत फ्रान्सच्या थॉमस रोक्सेलचा ४१ मिनिटांत २१-११, २२-२० असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारल्यानंतर कश्यपला दुसऱ्या सेटमध्ये कडव्या झुंजीस सामोरे जावे लागले. मात्र अनुभवाच्या जोरावर कश्यपने विजयी कूच केली.त्याचवेळी पाचव्या मानांकीत के. श्रीकांतला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात श्रीकांतला चीनच्या बिगरमानांकीत तियान हुवेईने नमवले. तियानने पहिला सेट जिंकून सामन्यात आघाडी घेतल्यानंतर श्रीकांतने सामना बरोबरीत आणला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये तियानपुढे निभाव न लागल्याने श्रीकांतचा १५-२१, २१-१३, ११-२१ असा पराभव झाला.