सराव जोड १
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
प्रथमच विश्वकप स्पर्धेत सहभागी झालेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी सुरुवातीला भारताच्या दोन फलंदाजांना माघारी परतवीत चांगली सुरुवात केली. धवनला हामिद हसनने क्लीनबोल्ड केले तर विराट केवळ ९ चेंडू खेळू शकला. दौलत जादरानने त्याला यष्टिरक्षक अफसर जजईच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
सराव जोड १
प्रथमच विश्वकप स्पर्धेत सहभागी झालेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी सुरुवातीला भारताच्या दोन फलंदाजांना माघारी परतवीत चांगली सुरुवात केली. धवनला हामिद हसनने क्लीनबोल्ड केले तर विराट केवळ ९ चेंडू खेळू शकला. दौलत जादरानने त्याला यष्टिरक्षक अफसर जजईच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानतर्फे नवरोज मंगलने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. उस्मान घनी (४४), जजई (२४) व असगर स्तानिकजई (२०) यांनी संघर्ष केला. अफगाणिस्तानची ३५ व्या षटकात २ बाद १५३ अशी स्थिती होती, पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले. ५४ धावांच्या मोबदल्यात त्यांच्या ६ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखविला. (वृत्तसंस्था)