शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

पोयसर जिमखाना, बीकेएम उपांत्य फेरीत

By admin | Updated: April 16, 2015 01:17 IST

राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेत पोयसर जिमखाना आणि बी. के. एम. स्पोटर््स क्लब या संघांनी निर्णायक विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली.

मुंबई : ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेत पोयसर जिमखाना आणि बी. के. एम. स्पोटर््स क्लब या संघांनी निर्णायक विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला गुडमॉर्निंग, विजय नवनाथ या संघांनी देखील उपांत्य फेरीत आगेकूच केली आहे.प्रभादेवी येथील एकनाथ ठाकूर क्रीडानगरीमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत मुंबईच्या पोयसर जिमखाना संघाने रंगतदार झालेल्या सामन्यात अनुभवी अमरहिंद मंडळाचे कडवे आव्हान ३६-२१ असे परतावले. पोयसरने सुरुवातीच्या काहीवेळेत वर्चस्व मिळवताना सामन्यावर नियंत्रण राखले. आरीफ सय्यद, प्रतिक ठाकूर यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर पोयसर संघाने आघाडी वाढवली. तर सिध्देश पाटीलने जबरदस्त पकडी करताना अमरहिंदच्या खेळाडूंना रोखून ठेवले. पराभूत संघाकडून रुपेश शेलार, आकाश पाटील आणि संतोष पवार यांचा प्रतिकार अखेर अपयशी ठरला.तत्पूर्वी चुरशीच्या झालेल्या सामन्यात रायगडच्या बीकेएम क्रीडा मंडळाने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना मुंबईच्या विजय क्लबला २८-२४ असा अनपेक्षित धक्का दिला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी बरोबरी साधल्याने सामना यानंतर अतिरीक्त ५-५ चढायांमध्ये खेळविण्यात आला. यामध्ये बीकेएम संघाने निर्णायक खेळ करताना बाजी मारली.मितेश पाटील, सुमित पाटील यांच्या खोलवर चढाया आणि मोहन पाटीलच्या दमदार पकडी संघाच्या विजयात निर्णायक ठरल्या. अजिंक्य कापरे, अमित चव्हाण, सुनील मोकल यांनी संघाचा पराभव टाळण्यासाठी अपयशी झुंज दिली.दुसऱ्या बाजूला गुडमॉर्निंग स्पोटर््स क्लबने उपांत्य फेरी गाठताना यंग प्रभादेवी संघाचा २९-१० असा सहजपणे फडशा पाडला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात मध्यंतरालाच मोठी आघाडी घेताना गुडमॉर्निंग संघाने सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. यानंतरच्या सावधपणे खेळलेल्या सामन्यात विजय नवनाथ संघाने बाजी मारत उत्कर्ष क्रीडा मंडळाला ९-५ असे नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना आजमवण्याचा प्रयत्न केला. (क्रीडा प्रतिनिधी)गुडमॉर्निंग स्पोटर््स क्लबने उपांत्य फेरी गाठताना यंग प्रभादेवी संघाचा २९-१० असा सहजपणे फडशा पाडला. अन्य एका सामन्यात विजय नवनाथ संघाने झुंजार बाजी मारत उत्कर्ष क्रीडा मंडळाला ९-५ असे नमवले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.