शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वन-डेमधील 'पॉवर प्ले' होणार बंद

By admin | Updated: June 27, 2015 13:20 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही नवीन बदलांना मान्यता दिली असून त्यानुसार यापुढे वन-डे सामन्यात फलंदाजी करणा-या संघाला 'पॉवर प्ले' मिळणार नाही.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २७ - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एकदिवसीय क्रिकेट सामन्यांतील नियम बदल केला असल्याने या नव्या बदलांमुळे गोलंदाजांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या नव्या नियमांनुसार क्रिकेटच्या मैदानातून 'पॉवर प्ले' हा प्रकार रद्द करण्यात आला असून शेवटच्या दहा षटकांत ३० यार्डाच्या सकर्लबाहेर पाच खेळाडू ठेवण्याचीही परवानगी मिळाली आहे. 
बार्बाडोस येथे एन. श्रीनिवासन  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत एकदिवसीय क्रिकेटमधील महत्वपूर्ण बदलांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे नवीन नियम येत्या ५ जुलैपासून लागू करण्यात येणार आहेत. 
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आम्ही नवीन शिफारसी मागवल्या होत्या, त्यानुसार आलेल्या शिफारसींची दखल घेत नवीन बदल करण्यात आले असून त्याचा फायदा गोलंदाजांना मिळू शकेल. 
आयसीसीने केलेले नवे बदल ?
-  फलंदाजी करणा-या संघाला 'पॉवर प्ले' मिळणार नाही 
- फलंदाजाला आता कोणत्याही नो-बॉलवर फ्री हिटची संधी मिळेल.
- पहिल्या १० षटकांत कॅचिंग पोझिशनवर क्षेत्ररक्षक ठेवणे अनिवार्य नाही
- शेवटच्या १० षटकांत ३० यार्डांच्या वर्तुळाबाहेर आता चारऐवजी पाच खेळाडू ठेवण्यास परवानगी