शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाजी ‘पॉवर प्ले’ बाद!

By admin | Updated: June 28, 2015 02:58 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वन डे क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत संतुलन साधण्यासाठी नियमांत दुरुस्ती केली. यानुसार फलंदाजी ‘पॉवर प्ले’ संपविण्याचा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल : आयसीसीने केल्या नियमात सुधारणा; ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेत अंमलबजावणी

बार्बाडोस : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वन डे क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत संतुलन साधण्यासाठी नियमांत दुरुस्ती केली. यानुसार फलंदाजी ‘पॉवर प्ले’ संपविण्याचा तसेच डावाच्या अखेरच्या १० षटकांत ३० यार्डाबाहेर पाच क्षेत्ररक्षक उभे करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला.नवे नियम ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेत लागू केले जातील, असे आयसीसीने म्हटले आहे. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवर हा निर्णय घेण्यात आला. गोलंदाजी व फलंदाजीत संतुलन साधण्यासाठी आणि या प्रकारातील उत्साह, आक्रमकपणा कायम ठेवण्यासाठी हा बदल केल्याचे आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले. नियमांत अशा केल्या सुधारणा...१५ ते ४० या षटकांदरम्यान घ्यावा लागणारा फलंदाजी ‘पॉवर प्ले’ नसेल.-अखेरच्या १० षटकांत ३० यार्डाबाहेर पाच खेळाडू उभे करता येणार.-एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या ‘नो बॉल’वर ‘फ्री’ हिट मिळणार आहे. -एकदिवसीय सामन्यात पहिल्या १० षटकांत दोन खेळाडूंना झेल घेण्याच्या ठिकाणी उभे करणे अनिवार्य नसेल.क्रिकेटमधील भ्रष्टाचार संपविण्यासाठी आम्ही कठोर उपाययोजना करीत आहोत. यासाठी सर्वाेपरी उपाययोजना करण्याचा आमचा संकल्प आहे. शिफारशी लागू केल्यास खेळातील वाईट प्रवृत्तीवर चौफेर नजर ठेवणे सोपे जाईल.- एन. श्रीनिवासन, आयसीसी चेअरमन