क्वालालम्पूर : आशियाडमध्ये पदक स्वीकारण्यास नकार देणारी भारताची बॉक्सर एल.सरितादेवी हिला कठोर शिक्षा मिळण्याची दाट शक्यता आहे. विश्व बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) तिचे निलंबन दीर्घकाळासाठी वाढविण्याचा पवित्र घेतला.
द. कोरियातील इंचियोन शहरात झालेल्या आशियाडमध्ये सरिता लाईटवेट गटात पराभूत झाली होती. कांस्याची मानकरी ठरलेल्या सरिताने पदक वितरण सोहळयात स्वत:चे पदक विरोधी खेळाडूला देण्याचा प्रय} केला होता. यावर कारवाई म्हणून एआयबीएलने तिच्यासह अन्य तीन कोचेसवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली. द. कोरियात सुरू असलेल्या विश्व बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होण्यास तिला मज्जाव करण्यात आला आहे. एआयबीएचे अध्यक्ष सीके वू म्हणाले, की या वादावर लवकर निर्णय घेण्यात येईल. सरिताला कठोर शिक्षा देण्याचे त्यांनी संकेत दिले.
ते पुढे म्हणाले, की सरिताला कठोर शिक्षा दिली जाईल. तिच्यावर कुठलीही दयामाया दाखविली जाणार नाही. विजयी होऊन चॅम्पियन बनणो पसंत असेल, तर तुम्हाला पराभव स्वीकारणोदेखील जमले पाहिजे. प्रत्येक खेळाडूने असे गैरवर्तन केले, तर स्पर्धेत दम राहणार नाही.
आशियाडच्या 6क् किलो वजन गटात सरिता ही आपल्या बाऊटमधील निकालावर समाधानी नव्हती. रेफ्रीने अन्याय केल्याची तिची भावना होती. तिने पदक स्वीकारण्यास आणि गळय़ात पदक घालून घेताना वाकण्यास नकार दिला. हे पदक सरिताने सेमीफायनलमध्ये पराभूत झालेली पार्क जी. हिच्या गळय़ात टाकले होते. भारतीय बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष संदीप जाजोदिया यांनी गेल्या महिन्यात एआयबीएकडे विनंती करीत सरितावरील बंदी
मागे घेण्याची मागणी केली होती. तिची ही प्रतिक्रिया पूर्वनियोजित
नसून भावनात्मक स्वरूपाची होती, असे कारण जाजोदिया यांनी
दिले होते.(वृत्तसंस्था)
सरकार
सरितासोबत : क्रीडामंत्री
नवी दिल्ली : आशियाडमधील कांस्य विजेती बॉक्सर एल. सरितादेवी हिने पदक परत केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने तिच्यावर आणखी कठोर कारवाईचे संकेत दिले. यावर आम्ही सरिताच्या पाठीशी असल्याची भूमिका केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी घेतली. जागतिक बॉक्सिंग संघटनेने खेळाडूचा सन्मान करावा, असेही त्यांनी आवाहन केले.
एआयबीएचा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगून सोनोवाल म्हणाले,की सरिताने झालेल्या चुकीचा पश्चात्ताप म्हणून लेखी माफी मागितली आहे. याचा विचार करायला हवा. खेळाडूवर आणखी कठोर र्निबध घालण्याचे संकेत ऐकून मला वाईट वाटले. या कठीण समयी आम्ही सरकार म्हणून तिच्या पाठीशी आहोत. साईच्या महासंचालकांना याबाबत सूचना देण्यात आली असून, ते बॉक्सिंग इंडियाशी यासंदर्भात चर्चा करतील.