शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

स्लेजिंगमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची शक्यता

By admin | Updated: February 11, 2015 01:34 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्लेजिंगविरुद्ध कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला असून, विश्वकप स्पर्धेत खेळाडू स्लेजिंगमध्ये दोषी आढळला

मेलबोर्न : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्लेजिंगविरुद्ध कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला असून, विश्वकप स्पर्धेत खेळाडू स्लेजिंगमध्ये दोषी आढळला, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्य आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले, ‘‘एखादा खेळाडू स्लेजिंगमध्ये पहिल्यांदा दोषी आढळला, तर त्याला मोठ्या रकमेच्या दंडाला सामोरे जावे लागेल आणि त्याने ही चूक पुन्हा केली, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येऊ शकते.’’रिचर्डसन पुढे म्हणाले, ‘‘आम्ही मैदानावर खेळाडूंच्या वर्तनावर नजर ठेवून असून, दोषी खेळाडूंबाबत दया-माया दाखविण्यात येणार नाही. ज्या खेळाडूंचे मैदानावरील वर्तन चर्चेचा विषय आहे, त्या खेळाडूंनी विश्वकप स्पर्धेदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केले, तर त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.’’आयसीसीच्या या निर्णयानंतर विराट कोहली, शिखर धवन आणि आॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांना संयम बाळगावा लागणार आहे. या खेळाडूंवर उभय देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान दंड ठोठावण्यात आला होता. (वृत्तसंस्था)