शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोर्तुगालकडून लात्विया पराभूत

By admin | Updated: November 15, 2016 01:00 IST

स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर बलाढट्य पोर्तुगालने फिफा विश्वचषक २०१८ पात्रता फेरीत विजयी कूच करताना लात्वियाला

लिस्बन : स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर बलाढट्य पोर्तुगालने फिफा विश्वचषक २०१८ पात्रता फेरीत विजयी कूच करताना लात्वियाला ४-१ असे लोळवले. रोनाल्डोच्या आक्रमक खेळापुढे लात्वियाचा निभाव लागला नाही.रविवारी रात्री झालेल्या या सामन्यात रोनाल्डोने आपला जलवा दाखवताना पोर्तुगालसाठी निर्णायक कामगिरी केली. २८व्या मिनिटाला त्याने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करताना पोर्तुगाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी पहिल्या सत्रापर्यंत कायम ठेवून मध्यंतराला पोर्तुगालने सामन्यावर नियंत्रण राखले. दुसऱ्या सत्रात मात्र पोर्तुगालने आणखी वेगवान खेळ केला. तसेच, लात्वियानेदेखील तोडीस तोड खेळ करताना पोर्तुगालला रोखण्याचा प्रयत्न केला. ६७व्या मिनिटाला आर्टर्स जूजिस याने शानदार गोल करून लात्वियाला १-१ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली. यानंतर ३ मिनिटांनी मिडफिल्डर विल्यम कार्वाल्हो याने गोल करून पोर्तुगालला २-१ अशा आघाडीवर नेले. तर, पुन्हा एकदा रोनाल्डोने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना ८५व्या मिनिटाला जबरदस्त गोल करून पोर्तुगालची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. यासह रोनाल्डोने आपल्या आंतरराष्ट्रीय गोलची संख्या ६८वर नेली. रोनाल्डोच्या या कामगिरीनंतर ९२व्या मिनिटाला डिफेंडर ब्रुनो एल्वेस याने गोल करून पोर्तुगालच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले. या शानदार विजयासह पोर्तुगालने ४ सामन्यांतून ९ गुणांची कमाई केली आहे. तसेच, ‘ब’ गटात अव्वल स्थानी असलेल्या स्वित्झर्लंडनंतर पोर्तुगालने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. (वृत्तसंस्था)