शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक नेमबाजीत पूजा घाटकरला १० मीटर एअर रायफलचे कांस्य

By admin | Updated: February 25, 2017 01:27 IST

सुरुवातीच्या तांत्रिक अडचणींवर मात करीत पूजा घाटकरने येथील डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये शुक्रवारी सुरू झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी

नवी दिल्ली : सुरुवातीच्या तांत्रिक अडचणींवर मात करीत पूजा घाटकरने येथील डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये शुक्रवारी सुरू झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक जिंकून दिले. माजी आशियाई चॅम्पियन असलेल्या २८ वर्षांच्या पूजाने २२८.८ गुणांसह कांस्य जिंकले. चीनच्या मेंगयावो शी हिने २५२.१ गुणांसह सुवर्ण जिंकून नवा विश्वविक्रम नोंदविला. तिची सहकारी डोें लिजी हिने २४८.९ गुणांसह रौप्यपदक पटकविले. मागच्यावर्षी रिओ आॅलिम्पिकचा कोटा मिळविण्यात थोड्या फरकाने वंचित राहिलेल्या पूजाने सुरुवातीला तांत्रिक चुका केल्या, पण लगेच सावरत पहिल्या फेरीत ती दुसऱ्या स्थानावर राहिली. अंतिम फेरीत लिजीकडून कडवे आव्हान मिळाल्यानंतरही फायनलदरम्यान पूजाच्या बंदूकचे ब्लार्इंडर पडले. तरीही अखेरचे काही शॉट तिने कौशल्याने मारले. पदकाचे श्रेय नारंगला : पूजा1कांस्य विजेती पूजा घाटकर हिने विश्वचषक स्पर्धेत जिंकलेल्या कांस्यपदकाचे श्रेय कोच आणि आॅलिम्पिक नेमबाज गगन नारंग याला दिले. नारंगने माझे करिअर घडविण्यात मोलाची मदत केल्याचे पूजाने विजयानंतर सांगितले. 2पूजाची कामगिरी पाहण्यासाठी नारंग स्वत: प्रेक्षकांत उपस्थित होता. पूजा म्हणाली, ‘मी योजना आखली नव्हती, पण गगनने मला मानसिक आणि तांत्रिक बळ दिले. काल त्याने मला जे मार्गदर्शन केले त्यानुसारच आज काम केल्याने मला यश लाभले आहे.’ 3यावेळी गगन म्हणाला,‘पूजाने प्रशिक्षणासाठी मला काहीसे ब्लॅकमेल केले होते. तिला पात्रता फेरीत यश यायचे, पण फायनलमध्ये अपयशाचा सामना करावा लागायचा. त्यावर तोडगा काढला. डावपेच आखून लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरलो.’