शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

उरुसानिमित्त पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:44 IST

येथील ऊरुसाला बुधवारपासून प्रारंभ होत असून या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील ऊरुसाला बुधवारपासून प्रारंभ होत असून या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले.परभणी येथील ऊरुस देशभरात प्रसिद्ध असून येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. ३१ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या काळात हा ऊरुस भरतो. उरुसात होणारी गर्दी लक्षात घेऊन भूरट्या चोºया होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दर्गा परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे. या ठिकाणी पोलीस चौकीची उभारणी करण्यात आली आहे. २०० होमगार्ड, ५०० पोलीस कर्मचारी आणि ५० पोलीस अधिकाºयांची बंदोबस्तकामी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यापासून ते दर्गापर्यंत पथसंचलन करण्यात आले. यावेळी प्रमुख रस्त्यावर झालेली अतिक्रमणेही हटविण्यात आली. दर्गा परिसरात अनाधिकृतरित्या लावलेली दुकानेही काढून घेण्यात आली. ऊरुस काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यापूर्वीच १९ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच दर्गा परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली.यंदा प्रथमच सीसीटीव्हीची नजरयावर्षी प्रथमच संपूर्ण ऊरुस परिसर सीसीटीव्हीच्या नजरेत राहणार आहे. मुख्य दर्गा तसेच गर्दीच्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दर्गा परिसरातील पोलीस चौकीत नियंत्रण कक्षही उभारण्यात आला आहे. दरवर्षी ऊरुसामध्ये लहान मुले हरविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी पोलीस चौकी परिसरात मोठा स्क्रीन लावला असून पोलिसांना सापडलेला मुलगा प्रत्यक्ष स्क्रीनवर दाखविला जाणार आहे. त्यामुळे हरवलेली मुले पालकांपर्यंत पोहचविण्याचे काम सोयीचे होणार आहे.आजपासून उरुसास प्रारंभहजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसाला ३१ जानेवारीपासून प्रारंभ होत असून प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून परभणीतील ऊरुस देशभरात ओळखला जातो. या वर्षाचे हे १११ वे वर्ष असून बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भोईगल्ली येथून गुसलची मिरवणूक काढली जाणार आहे. भोईगल्लीतील नसीर अहेमद खान यांच्याकडे या मिरवणुकीचा मान आहे. नसीर अहेमद खान यांच्या घरापासून निघालेली ही मिरवणूक स्टेशन परिसरातील जिल्हा वक्फ कार्यालयात पोहचते. या ठिकाणाहून शहरातील प्रमुख मार्गांवरुन दर्गा येथे ही मिरवणूक वाजत-गाजत नेली जाते. हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या दर्गा परिसरात धार्मिक विधी पार पडल्यानंतर उरुसाला रितसर प्रारंभ होतो.