ब्रासेलिया : मिडफिल्डर पॉल पोग्बाने नोंदविलेल्या गोलनंतर नायजेरियाच्या जोसेफ योबोने केलेल्या आत्मघातकी गोलमुळे फ्रान्सने सोमवारी खेळल्या गेलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नायजेरियाचा 2-0 असा पराभव केला आणि फिफा विश्वकप स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये धडक मारली. या पराभवामुळे नायजेरियाचे विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले.
आज खेळल्या गेलेल्या लढतीत 78व्या मिनिटार्पयत गोलफलक कोराच होता. 79व्या मिनिटाला पॉल पोग्बाने हेडरद्वारे गोल नोंदवून फ्रान्सचे खाते उघडले. अखेरच्या मिनिटाला माथियू वाल्बुनाच्या क्रॉसवर योबोने आत्मघातकी गोल नोंदविला. या लढतीत सुरुवातीला 2क् मिनिटे नायजेरिया संघाने वर्चस्व गाजविले. नायजेरियाला 17 व्या मिनिटाला फ्री किक मिळाली; पण सुपर ईगलला त्यावर गोल नोंदवता आला नाही. त्यानंतर दोन मिनिटांनी इमॅन्युएल इमेनिकला संधी होती, पण पंचानी त्याला ऑफ साईड ठरविले. सुरुवातीला फ्रान्स संघ बॅकफूटवर असल्याचे चित्र होते. 22 व्या मिनिटाला फ्रान्स संघाने उत्कृष्ट चाल रचत नायजेरियाच्या गोलक्षेत्रत मुसंडी मारली; पण नायजेरियन बचावपटूंनी त्यांचे आक्रमण परतवून लावले. मध्यंतरापूर्वीचे 12 मिनिटे फ्रान्स संघाने वर्चस्व गाजवले खरे; पण त्यांना गोलची कोंडी फोडता आली नाही.
फुटबॉल वर्ल्डकपमध्ये फ्रान्स संघाने बाद फेरीत प्रवेश मिळविल्यानंतर किमान उपांत्य फेरी गाठली. यंदा साखळी लढतीत होंडुरासवर 3-क्, दुस:या लढतीत स्वित्ङरलडला 5-2 असा धडा शिकविला; पण इक्वाडोअरविरुद्ध तिस:या लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागले.
1998 नंतर नायजेरियाचा हा पहिला नॉकआऊट सामना होता. त्यांनी यापूर्वी 1994 आणि 1998 मध्ये वर्ल्डकपच्या अंतिम 16 संघांत स्थान पटकावले होते. दोन्ही वेळा त्यांना युरोपीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता़ स्पर्धेपूर्वी खेळाडूंचे मानधन न मिळाल्यामुळे खेळाडूंनी वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा इन्कार केला होता; मात्र प्रकरणावर तोडगा काढण्यात आला आणि नायजेरिया ब्राझीलमध्ये दाखल झाला.
(वृत्तसंस्था)