शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडाप्रेमी पालकांमुळेच देशाची शान उंचावली

By admin | Updated: May 8, 2016 03:13 IST

एकेकाळी आपल्या देशात मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे पालक निर्माण होतील असे कदापी वाटले नव्हते, पण आज हा बदल घडला आहे. अशा पालकांमुळेच क्रीडा क्षेत्रात

पुणे : एकेकाळी आपल्या देशात मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे पालक निर्माण होतील असे कदापी वाटले नव्हते, पण आज हा बदल घडला आहे. अशा पालकांमुळेच क्रीडा क्षेत्रात भारताची शान उंचावली आहे, अशी उत्स्फूर्त भावना पहिले विश्वकरंडकविजेते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केली.पुणे आंतरराष्ट्रीय स्पोर्टस् एक्स्पोतर्फे (पीआयएसई) आॅलिंपियन तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख संयोजक डॉ. विश्वजित कदम व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची आई नसीमा, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची आई वर्षा, क्रिकेटपटू झहीरचे आई-वडील झाकिया-बख्तियार, फुटबॉलपटू सुनील छेत्रीचे वडील केबी छेत्री, हॉकीपटू धनराज पिल्लेची आई अंदालम्मा, स्पेशल आॅलिंपिकचा खेळाडू भरत चव्हाणचे वडील जय यांना कपिलदेव यांच्या हस्ते गौरवचिन्ह आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले.कपिल देव पुढे म्हणाले, आपल्याकडे आता खेळाडूंना प्रोत्साहनसुद्धा दिले जात आहे. आजचा दिवस अशा पालकांचा आहे. खेळाडूच्या वाट्याला अनेक सत्कार येतात, पण पालकांच्या वाट्याला असा गौरवाचा क्षण दुर्मिळ असतो. हा योग जुळवून आणल्याबद्दल मी पुणे स्पोर्टस् एक्स्पोचे अभिनंदन करतो. सचिन आणि कांबळी यांनी सोबतच करिअरला सुरुवात केली होती. दोघांमध्ये समान प्रतिभा होती. कांबळी कदाचित जास्त प्रतिभावान होता. मात्र, त्याचे सहायक, मित्र, घरचे वातावरण सचिनपेक्षा वेगळे असू शकेल. मात्र, त्यानंतर काय झाले हे सगळ्यांनाच माहीत आहे. सचिन देशासाठी २४ वर्षे खेळला. तर कांबळी खेळापासून दूर झाला. प्रतिभा ही महत्त्वाचीच आहे. मात्र, खेळाडूसाठी अधिक गरजेचे आहे ते मित्र, आईवडील, भाऊ, बहीण आणि प्रशिक्षण संस्थेचे समर्थन.डॉ. विश्वजित कदम यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. त्यांनी पालकांचा सन्मान करणे हा पीआयएसईचा बहुमान असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, की बार्शीसारख्या दुष्काळग्रस्त भागातून प्रार्थना ठोंबरेचा तिच्या पालकांच्या पाठिंब्यामुळे उदय झाला. आता हीच प्रार्थना आॅलिंपिकमध्ये सानियासह भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची अपेक्षा आहे. तिने महाराष्ट्राची आणि देशाची शान उंचावली आहे. केबी छेत्री यांच्या पाठिंब्यामुळेच सुनील तरुण वयात देशाचे नेतृत्व करू शकला. धनराजला घरात अनेक हॉकीपटू असण्याचा फायदा झाला आणि अंदालम्मा यांनी त्याला प्रोत्साहन दिले. स्पेशल आॅलिंपियन घडविलेल्या जय चव्हाण यांना तर सलाम करावा लागेल.(क्रीडा प्रतिनिधी)आपला मुलगा इंजिनिअर, डॉक्टर झाला नाही तरी खेळाडू बनूनही मोठा होऊ शकतो, हे आता पालकांना कळले आहे. त्यामुळेच आपल्या मुलाने सचिन, विराट बनावे, असे स्वप्न पाहणारे पालक आज दिसत आहेत. मुलांच्या हातातून पेन-पेन्सिल काढून घेऊ नका, पण तसेच त्यांच्या हातातून बॅट-बॉलसुद्धा काढून घेऊ नका. आपल्या देशात क्रीडा संस्कृती वाढत आहे, ही चांगली बाब आहे. - कपिल देव