शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

‘आयपीएल’मुळे पीटरसन बिथरला : हुसेन

By admin | Updated: October 11, 2014 04:38 IST

भारतात इंडियन प्रीमियर लीग खेळायला लागल्यानंतर केव्हिन पीटरसन हा संघापेक्षा स्वत:ला मोठा समजू लागला. अन्य खेळाडूंना माझ्या कमाईचा हेवा वाटतो

लंडन : भारतात इंडियन प्रीमियर लीग खेळायला लागल्यानंतर केव्हिन पीटरसन हा संघापेक्षा स्वत:ला मोठा समजू लागला. अन्य खेळाडूंना माझ्या कमाईचा हेवा वाटतो, असे वारे त्याच्या डोक्यात शिरू लागले होते. ‘आयपीएल’मुळेच पीटरसनचे डोके खराब झाल्याची टीका इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने केली.स्वत:च्या आत्मचरित्रात सहकारी आणि कोचवर चिखलफेक करणाऱ्या पीटरसनने अनेक धक्कादायक खुलासे करताना अनेकांवर शरसंधान साधताना इंग्लिश क्रिकेटची हानी केली, असे हुसेनचे मत आहे. वृत्तपत्रातील स्तंभात हुसेन म्हणतो, ‘आयपीएल खेळल्यापासून पीटरसनची मन:स्थिती बदलली. पैशाची नशा त्याच्या डोक्यात भिनली आणि संघापेक्षा तो स्वत:ला मोठा मानू लागला. सहकाऱ्यांना तो तुच्छ समजत होता. आत्मचरित्रात हीच अरेरावी कथन केली आहे. इंग्लंड संघातील सर्वांत यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या पीटरसनला आयपीएलने खराब करून टाकले.’इंग्लंड संघातून निलंबित करण्यात आलेल्या ‘केपी’ने आत्मचरित्रात कोच अ‍ॅण्डी फ्लॉवर यांच्यावर सडकून टीका केली. यावर हुसेन म्हणतो, ‘फ्लॉवर यांनी पीटरसनला योग्य वळणावर आणण्यासाठी आठोकाठ प्रयत्न केले. निकाल संघाच्या विरोधात जात असताना देखील हा स्टार खेळाडू अनेकांना तुच्छ समजत होता. जेव्हा पाणी डोक्यावरून जाऊ लागले तेव्हा मात्र केपीसाठी सर्वच जण चुकीचे असू शकत नाहीत, अशी फ्लॉवर यांना खात्री पटली होती. जगातील सर्वाधिक बोलणारा समालोचक असलेल्या हुसेनने अपेक्षा वर्तविली की ‘‘पीटरसन एक ना एक दिवस इतरांना चुकीचे ठरविणे सोडून स्वत:च्या चुकांचे आत्मपरीक्षण नक्की करेल. त्याला चुकांचा पश्चात्ताप होईल आणि मी असा का वागलो, हे पटायला लागेल, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.’’ (वृत्तसंस्था)