शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

फेल्प्सला १९वे सुवर्ण

By admin | Updated: August 9, 2016 00:49 IST

आॅलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलिट अमेरिकेच्या मायकल फेल्प्स याने रिओतील जलतरण स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कारकिर्दीतील १९ व्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले

रिओ : आॅलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलिट अमेरिकेच्या मायकल फेल्प्स याने रिओतील जलतरण स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कारकिर्दीतील १९ व्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर अमेरिकेच्याच केटी लेदेस्की हिने महिलांच्या ४०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. आपल्या पाचव्या आॅलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या ३१ वर्षीय फेल्प्स याने अमेरिका संघाला रेयान हेल्ड, सीलेब ड्रेसल यांच्या साथीने चार बाय १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात रिले टीमला गोल्ड मिळवून दिले. या खेळाडंूनी ३ मिनिटे आणि ९.९२ सेकंदांची वेळ नोंदवीत सुवर्णपदकावर ताबा मिळविला. फेल्प्सचे आॅलिम्पिकमधील हे १९ वे सुवर्णपदक ठरले. त्याने खेळाच्या या महाकुंभात आतापर्यंत एकूण २३ पदके आपल्या नावे केली आहेत. या पदकांत १९ गोल्डसह दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. आॅलिम्पिकमधील जलतरण स्पर्धेत पहिल्या दोन दिवसांत एकूण सहा विक्रम झाले. अमेरिका आणि आॅस्ट्रेलियाच्या खात्यात प्रत्येकी दोन सुवर्ण जमा झाले आहेत. महिला गटात अमेरिकेच्या लेदेस्की हिने १.९१ सेकंदाची वेळ नोंदवून आपलाच पूर्वीचा विक्रम मोडीत काढत ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये गोल्ड पटकावले. तिने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला केवळ ५ सेकंदांच्या अंतराने पराभूत केले. अमेरिकेच्या रिलेटीमकडून दुसऱ्या फेरीत उतरलेल्या फेल्प्सने चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गोल्ड मिळविणारा पहिलाच जलतरणपटू होण्याचा मान मिळविला आहे. फेल्प्स, रियान हेल्ड, सीलेब ड्रेसल आणि १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये विश्वचॅम्पियन नॅथन एड्रियनच्या अमेरिका रिले टीमने चार बाय १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ३ मिनिटे आणि ९.९२ सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण मिळविले. दरम्यान, लंडन आॅलिम्पिकमधील चॅम्पियन फ्र ान्सला आॅलिम्पिकमधील जलतरणमध्ये या वेळी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर कांस्यपदक आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी पटकावले. स्वीडनच्या सारा जोस्ट्रोमने इतिहास रचताना जलतरण स्पर्धेत देशाला पहिले सुवर्ण मिळवून दिले. तिने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात ही कामगिरी केली. कॅनडाच्या १६ वर्षीय पेनी ओलेक्सिआक हिने रौप्य, तर अमेरिकेच्या डाना वोल्मर यांनी कांस्यपदक मिळविले. विशेष म्हणजे आई बनल्यानंतर या खेळात पदक मिळविणारी डाना दुसरीच खेळाडू ठरली आहे. यापूर्वी डारा टॉरेस हिने हा विक्रम आपल्या नावे केला होता. भारत आज तिरंदाजी : वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात एलिमेंटरी राऊंड : यामध्ये भारताची दीपिकाकुमारी किंवा बोंबायलादेवी या दोघींपैकी एकीची फेरी होऊ शकते. ३२ खेळाडूंमधून जे विजयी होतील त्यातील १६ खेळाडू उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र होतील : सायं. ५.३० वा. मुष्टियुद्ध : पुरुष : विकास कृष्णा : रात्री ८.३० वा. रोर्इंग : पुरुष : दत्तू भोकनळ (सिंगल स्कल) सायं. ५नेमबाजी : महिला : हीना सिद्धूू : २५ मी. पिस्तूल रात्री १२ वा.