्रपीसीबी खेळाडूंच्या सामन्यातील 25 टक्के वेतन कपात करणार
By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST
कराची: पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे केंद्रिय करारबद्ध खेळाडू जर राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या स्तरावरील सामन्यामध्ये फिटनेस कायम राखण्यात असफल झाले तर त्यांच्या वेतनातील 25 टक्के रक्कम कपात केली जाणार असल्याचे एनसीएमधील मुख्य कोच मोहम्मद अक्रम यांनी सांगितल़े अक्रम म्हणाले, लाहोरमध्ये या आठवड्यात केंद्रिय करारबद्ध खेळाडूंसह काही खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात आली़ लाहोरमध्ये जून-जुलैमध्ये झालेल्या फिटनेस शिबिरानंतरचा भाग आह़े गत शिबिरामध्ये खेळाडूंना एनसीएच्या कोचिंग पॅनल आणि फिटनेस ट्रेनरद्वारा निश्चित मानक पूर्ण करावे लागणार असल्याचे सूचित करण्यात आले होत़े 17 प्रकारच्या फिटनेस चाचणीचे परिणाम या आठवड्यात येतील़ जर एखादा खेळाडू निश्चित सीमारेषेची पूर्तता करू शकला नाही तर पुढील चार महिन्यासाठी त्याच्या वेतनातील 25 टक्के रक्कम कपात करण्यात य्
्रपीसीबी खेळाडूंच्या सामन्यातील 25 टक्के वेतन कपात करणार
कराची: पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे केंद्रिय करारबद्ध खेळाडू जर राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या स्तरावरील सामन्यामध्ये फिटनेस कायम राखण्यात असफल झाले तर त्यांच्या वेतनातील 25 टक्के रक्कम कपात केली जाणार असल्याचे एनसीएमधील मुख्य कोच मोहम्मद अक्रम यांनी सांगितल़े अक्रम म्हणाले, लाहोरमध्ये या आठवड्यात केंद्रिय करारबद्ध खेळाडूंसह काही खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात आली़ लाहोरमध्ये जून-जुलैमध्ये झालेल्या फिटनेस शिबिरानंतरचा भाग आह़े गत शिबिरामध्ये खेळाडूंना एनसीएच्या कोचिंग पॅनल आणि फिटनेस ट्रेनरद्वारा निश्चित मानक पूर्ण करावे लागणार असल्याचे सूचित करण्यात आले होत़े 17 प्रकारच्या फिटनेस चाचणीचे परिणाम या आठवड्यात येतील़ जर एखादा खेळाडू निश्चित सीमारेषेची पूर्तता करू शकला नाही तर पुढील चार महिन्यासाठी त्याच्या वेतनातील 25 टक्के रक्कम कपात करण्यात यावी असे आम्हाला सांगण्यात आले आह़े