नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवडणुकीबाबत साशंकता असताना बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे म्हटले आहे. पवार २००५ ते २००८ या कालवधीत बीसीसीआयचे अध्यक्ष व आयसीसीचे प्रमुख होते. निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या गटाकडून बीसीसीआयची सत्ता मिळविण्याचे पवार यांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक लढविता येत नाही. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले पवार म्हणाले, ‘मी अद्याप याबाबत विचार केलेला नाही. मी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छुक नाही.’पवार यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पण, त्यावेळी बीसीसीआयच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. (वृत्तसंस्था)
‘बीसीसीआय’ची निवडणूक लढण्याची पवारांची इच्छा नाही
By admin | Updated: February 27, 2015 00:37 IST