शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जयपूरला नमवून पाटणा उपांत्य फेरीत

By admin | Updated: August 19, 2015 23:11 IST

दोनही संघांसाठी ‘करो या मरोची लढाई’ असणाऱ्या उत्कंठावर्धक सामन्यांत पाटणा पायरेट्स संघाने जयपूर पिंक पँथर्स संघावर २६-२४ असा निसटता विजय

विशाल शिर्के, पुणेदोनही संघांसाठी ‘करो या मरोची लढाई’ असणाऱ्या उत्कंठावर्धक सामन्यांत पाटणा पायरेट्स संघाने जयपूर पिंक पँथर्स संघावर २६-२४ असा निसटता विजय मिळवीत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. ताए डेओक इओम, गुरविंदरसिंग, दीपक व संदीप नरवाल यांच्या खेळीने पाटणाचा विजय झाला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात ही अटीतटीची लढत झाली. जयपूर पिंक पँथर्सचा मालक अभिषेक बच्चन याने सामन्याला हजेरी लावली होती. पटणा पायरेट्स व जयपूर पिंक पँथर यांच्यातील सामन्यात पहिल्या हापमध्ये पाटणाचे वर्चस्व राहिले. आक्रमणाला संरक्षणाची अप्रतिम साथ मिळाल्याने पाटणा पायरेट्सने वर्चस्व गाजविले. पाटणाच्या गुरविंदर सिंग, ताए डेओक इओम यांनी आक्रमणाबरोबरच उत्कृष्ट संरक्षण केले. इओम याने अष्टपैलू खेळी करीत संघाला वर्चस्व मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याला राकेश कुमार, संदीप नरवाल यांच्या पकडीची मोलाची साथ लाभली. त्यामुळे १२ व्या मिनिटाला जयपूर पँथरवर लोन चढविण्यात पाटणा पायरेट्स यशस्वी ठरले. मध्यंतरापर्यंत पाटणाकडे १६-९ अशी भक्कम आघाडी होती.जयपूर संघाकडून राजेश नरवाल याने आक्रमक चढाया करीत पाटणा पायरेट्सला जेरीस आणले. उत्तरार्धात राजेश नरवाल, रणसिंग, सोनू नरवाल, जसवीर सिंग यांनी सुरेख खेळ करीत पिछाडी भरुन काढली. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला पाटणा केवळ २३-२० असे आघाडीवर होते. उत्तरार्धात राजेश नरवाल, रणसिंग, सोनू नरवाल, जसवीर यांनी आक्रमक खेळ केला. मात्र त्यांची खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.