शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गोळाफेकपटू मनप्रीत डोपमध्ये अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:44 IST

आशियाई चॅम्पियन गोळाफेकपटू मनप्रीत कौर ही डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने नुकतेच भुवनेश्वरमध्ये तिने जिंकलेले सुवर्ण गमविण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : आशियाई चॅम्पियन गोळाफेकपटू मनप्रीत कौर ही डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने नुकतेच भुवनेश्वरमध्ये तिने जिंकलेले सुवर्ण गमविण्याची शक्यता आहे.पतियाळा येथे १ ते ४ जून या कालावधीत पतियाळा येथे झालेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय चॅम्पियनशिपदरम्यान राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने(नाडा) तिचे नमुने घेतले होते. त्यात प्रतिबंधित स्टिम्युलेंट डायमेथिलबुटिलेमाइन हे द्रव्य आढळून आले. ‘ब’ नमुना पॉझिटिव्ह आढळल्यास तिला आशियाई सुवर्ण गमवावे लागणार आहे.भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,‘ मनप्रीत जूनमध्ये झालेल्या फेडरेशन चषक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पॉझिटिव्ह आढळली होती. तिच्या लघवीच्या नमुन्यात स्टिम्युलेंट डायमेथिलबुटिलेमाइन हे द्रव्य आढळून आले. नाडाकडून काल रात्री आम्हाला ही माहिती मिळाली.’मनप्रीतचे कोच आणि पती करमजित म्हणाले, ‘आम्हाला या संदर्भात अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही.’सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा एखादा खेळाडू स्टिम्युलेंट डायमेथिलबुटिलेमाइन सेवनात दोषी आढळला आहे. याआधी २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडू मेथिल हेक्सानामाइन सेवनात दोषी आढळले होते. मनप्रीत लंडनमध्ये पुढील महिन्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली आहे. पण आता तिचा सहभागही धोक्यात आला. (वृत्तसंस्था)एएफआयचा अधिकारी म्हणाला, ‘याबाबत अद्याप विचार केला नसला तरी जागतिक स्तरावर नाचक्की होऊ नये यासाठी विचार करावा लागेल. मनप्रीतने चीनमध्ये झालेल्या आशियाई ग्रॅण्डप्रिक्समध्ये १८.८६ मीटर गोळाफेक करीत विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्रता सिद्ध केली होती.