शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पार्थिव, रायडूची दमदार खेळी

By admin | Updated: April 26, 2016 05:32 IST

भेदक गोलंदाजीवर मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल ९ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा २५ धावांनी पराभव केला.

मोहाली : पार्थिव पटेल (८१), अंबाती रायुडू (६५) यांची आक्रमक फटकेबाजी आणि नंतर टीम साउदी (२/२८), मिशेल मॅक्लेनघन (२/३२) जसप्रीत बुमराह (३/२६) यांच्या भेदक गोलंदाजीवर मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल ९ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा २५ धावांनी पराभव केला. किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला १९0 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा डाव १६४ धावांत संपुष्टात आला. त्यांच्या शॉन मार्शने ३४ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार मारून ४५ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने ३९ चेंडंूत ५ चौकार व १ षटकार ठोकून ५६ धावांची दमदार खेळी केली. डेव्हीड मिलर १७ चेंडूंत १ चौकार व २ षटकार मारून ३0 धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल आणि अंबाती रायुडू यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ बाद १८९ अशी मजल मारली होती. पंजाबच्या संदीप शर्माने मुंबईला पहिल्याच षटकात कर्णधार रोहित शर्माला शून्यावर बाद करून झटका दिला. त्यानंतर पार्थिव पटेल व अंबाती रायुडूने यांनी दुसऱ्या गड्यासाठी १४.१ षटकांत १३७ धावांची भागीदारी केली. पार्थिवने ५८ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ८१ धावांचे योगदान दिले. रायुडूने ३७ चेंडंूत प्रत्येकी चार चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने ६५ धावा ठोकल्या. जेम्स बटलरनेदेखील अवघ्या १३ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह २४ धावा व केव्हिन पोलार्डने दहा धावा केल्या होत्या. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स : २० षटकात ६ बाद १८९ ( रोहित शर्मा ००, पार्थिव पटेल ८१, अंबाती रायुडू ६५, जेम्स बटलर २४, किरॉन पोलार्ड १०, हार्दिक पंड्या ४, कुणाल पंड्या नाबाद ००, अवांतर : ५; गोलंदाजी : संदीप शर्मा १/२०, मिशेल जॉन्सन १/४३, अक्षर पटेल ४१/१, मोहित शर्मा ३/३८. किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकात ७ बाद १६४ (मुरली विजय १९, मनन व्होरा ७, शॉन मार्श ४५,ग्लेन मॅक्सवेल ५६, डेव्डिड मिलर नाबाद ३०, निखिल नायक १, अक्षर पटेल १,,मिचेल जॉनसन १, मोहित शर्मा नाबाद ०; अवांतर : ५; गोलांदाजी :टीम साउदी २/२८, मिशेल मॅक्लेनघन २/३२, जसप्रीत बुमराह ३/२६).