शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Paris Olympic 2024 : भालाफेक! पाकिस्तानचा खेळाडू नीरज चोप्राला आव्हान देणार; फायनलमध्ये IND vs PAK

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 16:17 IST

neeraj chopra vs arshad nadeem : नीरज चोप्रा आणि पाकिस्तानच्या अर्शद नदीमने फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : भारत यंदाच्या ऑलिम्पिकमधील आपल्या पहिल्या सुवर्ण पदकाच्या प्रतीक्षेत आहे, तर पाकिस्तानला अद्याप एकही पदक जिंकता आले नाही. भारताने तीन कांस्य पदक जिंकली आहेत, तर शेजाऱ्यांच्या खात्यात भोपळा आहे. पण, मंगळवारी झालेल्या भालाफेक प्रकाराच्या पात्रता फेरीत दोन्हीही देशातील खेळाडूंना यश आले. ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत ८४ मीटर भाला फेकल्यास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. हे अंतर गाठणारा खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतो. भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीप यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ८ ऑगस्ट रोजी हे दोघेही शिलेदार पदकासाठी मैदानात असतील. एकूणच फायनलमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत पाहायला मिळेल. कारण नीरज पदकाचा प्रबळ दावेदार असला तरी अर्शदने चांगली कामगिरी करत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले.

भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा नीरज चोप्रा पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या फायनलचे तिकीट मिळवण्यात त्याने यश मिळवले. मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. 

नीरज चोप्राची पदकाच्या दिशेने वाटचाल 

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८६.८५ मीटर भाला फेकून फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. त्याने देखील पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्येही अर्शदने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तो पहिल्या तीनमध्ये न आल्याने त्याला पदक जिंकता आले नाही. दुसरीकडे भारताच्या नीरज चोप्राने ८७.५८ भाला फेकून सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. पाकिस्तानचा अर्शद नदीम ८४.६२ मीटर एवढ्या अंतरासह पाचव्या क्रमांकावर राहिला होता. 

अर्शद नदीम फायनलमध्ये 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानNeeraj Chopraनीरज चोप्रा