शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मोदी यांनाही आंचलच्या वडिलांनी दिले पॅराग्लायडिंगचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:20 IST

स्किर्इंगमध्ये भारताला पहिले आंतरराष्टÑीय पदक जिंकून देणारी मनालीची आंचल ठाकूर हिचे वडील रोशनलाल ठाकूर यांनी कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील पॅराग्लायडिंग शिकविले आहे. २० वर्षांपूर्वींच्या त्या आठवणींना उजाळा मिळाला. मोदी यांच्याकडून आंचलचे अभिनंदन हा रोशनलाल यांच्यासाठी अतिशय गर्वाचा क्षण होता.

नवी दिल्ली : स्किर्इंगमध्ये भारताला पहिले आंतरराष्टÑीय पदक जिंकून देणारी मनालीची आंचल ठाकूर हिचे वडील रोशनलाल ठाकूर यांनी कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील पॅराग्लायडिंग शिकविले आहे. २० वर्षांपूर्वींच्या त्या आठवणींना उजाळा मिळाला. मोदी यांच्याकडून आंचलचे अभिनंदन हा रोशनलाल यांच्यासाठी अतिशय गर्वाचा क्षण होता.आंचलने तुर्कस्थान येथे अल्पाईन २३०० कपमध्ये कांस्यपदक जिंकले. भारतात या खेळाची फार कमी चर्चा होते. आंचलचे अभिनंदन करणाºयांत पहिले नाव मोदी यांचेच होते. मोदी यांनी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशात झालेल्या एका निवडणूक सभेत रोशनलाल यांचा उल्लेख करीत दोन दशकांआधी सोलांग येथे पॅराग्लायडिंग करण्याची संधी ठाकूर यांनी दिल्याचे म्हटले होते. पंतप्रधानांनी ज्यांचे नाव उच्चारले ते आंचलचे वडील आणि भारतीय शीतकालीन क्रीडा महासंघाचे महासचिव रोशनलाल ठाकूर हेच आहेत.मनाली येथून वृत्तसंस्थेशी बोलताना ठाकूर म्हणाले, ‘मला आज किती गर्व वाटतो, हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मोदी मला ओळखतील का, हे माहिती नाही. आंचल माझी मुलगी आहे. ’ठाकूर यांनी शीतकालीन क्रीडा प्रकाराची दशा सुधारण्यासाठी मोदी यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. भारतात या खेळाचा विकास करण्याची विनंती करायची असल्याने मी लवकरात लवकर मोदी यांची भेट घेणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)१९९७ मध्ये मोदी भाजपचे हिमाचल प्रदेश प्रभारी या नात्याने दौºयावर होते. सोलांग येथे त्या वेळी ठाकूर यांच्या मार्गदर्शनात हिमाचल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स येथे त्यांनी पॅराग्लायडिंग केले. ‘पावसामुळे हवामान खराब होते. तरीही मोदी हार मानायला तयार नव्हते.अखेर पॅराग्लायडिंग केलेच. तेव्हापासून मोदी सोलांगला आले की सहकाºयांसह पॅराग्लायडिंगचा आनंद लुटायचे. २०१२ ला गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींसोबत फोनवर बोलणे झाले. त्यांनी मला सापुतारा येथे साहसी क्रीडा संस्थेच्या स्थापनेस मदत करण्यास पाचारण केले होते.’

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी