बंगळुरू : येथे सुरू असलेल्या आयबीएसएफ विश्व स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पंकज अडवाणीने ग्रुप एचमधील सलामीच्या लढतीत विजयी सुरुवात केली़ महिला गटात गतविजेत्या बेल्जियमच्या वेंडी जेन्सने पहिल्या सामन्यात सरशी साधली़ वेंडी जेन्सने महिला गटात आॅस्ट्रेलियाच्या केथी पॅराशिसचा ७१-३५, ७५-१५, ७७-४४ असा पराभव केला़ त्याआधी भारताच्या पंकज अडवाणीने ग्रुप एचमधील सलामीच्या सामन्यात मलेशियाच्या किन हू मो याला ७१-३४, ८५-०, २५-६२, ४६-५८, ६७-१९, ६९-४४ अशी धूळ चारली़स्पर्धेतील अन्य लढतीत पुरुष ए गटात अमीर सरखोश, मोहंमद खैरी, अंतोनिस पाउलोस, तर सी गटात कित्सानुत लेर्तसातायाथोर्न आणि राफेत हाबीब यांनी आपापल्या गटात विजय मिळविला़ (वृत्तसंस्था)
पंकज अडवाणीची विजयी सलामी
By admin | Updated: November 21, 2014 00:30 IST