शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मलिकच्या शतकाने पाकची झिम्बाब्वेवर मात

By admin | Updated: May 28, 2015 01:34 IST

शोएब मलिकच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने झिम्बाब्वेचा ४१ धावांनी पराभव करताना तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे.

लाहोर : शोएब मलिकच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने झिम्बाब्वेचा ४१ धावांनी पराभव करताना तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे.मलिकने अवघ्या ७६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली. त्याचे हे सहा वर्षांनंतरचे पहिले शतक ठरले. याशिवाय हॅरीस सोहेलने नाबाद ८९, मोहम्मद हाफीजने ८६ आणि कर्णधार अजहर अलीने ७९ धावा केल्या. या बळावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ३७५, अशी विशाल धावसंख्या गाठली.त्याआधी टी-२0 मालिकेत दोन्ही सामन्यांत निसटता पराभव पत्करावा लागणाऱ्या झिम्बाब्वेने पुन्हा पाकिस्तानला सहज विजय मिळवू दिला नाही. कर्णधार चिगुंबुराने ९५ चेंडूंत १0 चौकार आणि चार षटकारांसह ११७ धावा केल्या; परंतु अखेरच्या क्षणी आवश्यक धावगती राखण्याच्या प्रयत्नात संघ दबावात आला. त्यामुळे झिम्माब्वे निर्धारित ५0 षटकांत ५ बाद ३३४ धावा करू शकला.चिगुंबुराशिवाय हॅमिल्टन मास्कदाजाने ७३ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी केली. याशिवाय चिगुंबुराने सीन विलियम्सच्या (३६) साथीने चौथ्या गड्यासाठी ७४ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून वहाब रियाजने ४७ धावांत ३ गडी बाद केले. झिम्बाब्वेने सामना गमावला असला तरी त्यांनी क्रिकेट चाहत्यांची मने जिंकण्यात मात्र यश मिळविले. याशिवाय त्यांनी पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्याही उभारली. त्यांनी बुलावायो येथे २00२मध्ये ९ बाद २९५ धावा केल्या होत्या. चिगुंबुराने वन-डेतील त्याचे पहिले शतक ठोकले. याआधी त्याची सर्वोत्तम खेळी ही ९0 धावांची होती, जी त्याने गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुलावायो येथे केली होती. दुसरा एकदिवसीय सामनादेखील गद्दाफी स्टेडियममध्ये शुक्रवारी खेळवला जाणार आहे, तर तिसरा सामना रविवारी होणार आहे.संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान ५0 षटकांत ३ बाद ३७५. (शोएब मलिक ११२, सोहेल ८९, हाफीज ८६, अजहर अली ७९, उत्सेया २/६३). झिम्बाब्वे : ५0 षटकांत ५ बाद ३३४. चिगुंबुरा ११७, मसकदाझा ७३, वहाब रियाज ३/४७).(वृत्तसंस्था)पाकिस्तान भूमीवरील भारताचा विक्रम तुटलालाहोर : भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तान भूमीवर केलेला सर्वाधिक धावांचा ७ वर्षांपूर्वीचा विक्रम पाकिस्तानने तोडला.पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध ३ बाद ३७५ धावा केल्या. ही पाकिस्तान भूमीवरील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. त्याआधीचा विक्रम भारताच्या नावावर होता. भारताने २00८ मध्ये एशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध कराचीत ४ बाद ३७४ धावा ठोकल्या होत्या.पाकची याआधी त्यांच्या भूमीवरील सर्वोत्तम धावसंख्या ६ बाद ३५३ अशी होती. ती त्यांनी इंग्लंडविरुद्ध २00५ मध्ये कराचीत नोंदवली होती. पाकच्या डावादरम्यान त्यांच्या चार आघाडीच्या फलंदाजांनी ७0 पेक्षा जास्त धावा केल्या. मोहम्मद हाफीजने ८६, अजहर अलीने ७९, शोएब मलिकने ११२ आणि हारीस सोहेलने नाबाद ८९ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात पहिल्या चार फलंदाजांनी ७0 पेक्षा जास्त धावांची खेळी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसे पाहता एकाच डावात चार फलंदाजांनी ५0 पेक्षा जास्त धावा करण्याचा वनडेतील हा एकूण ५0 वा क्षण आहे.