ऑनलाइन लोकमत सिडनी, दि. ११ - इंग्लंडविरुध्द पाकिस्तान यांच्यात आज खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपच्या सराव सामन्यात पाकिस्तान संघाने इंग्लंडचा ४ विकेट आणि ७ चेंडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणा-या इंग्लंड संघाने ५० षटकांत २५० धावा केल्या. इंग्लंडकडून जोए रुटने सर्वाधिक ८५ धावा केल्या. सलामीला आलेला अली ४ धावा काढून स्वस्तात बाद झाला. हेल्स ३१, बॅलेन्स ५७, मॉर्गन ०, बोपारा ११, बटलर १३, ब्रॉड ० तर जॉर्डन ३१ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंड संघाने ८ गडयांच्या बदल्यात २५१ धावांचे आव्हान पाकिस्तान संघासमोर ठेवले. इंग्लंडचे हे आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या पाकची सुरूवात खराब झाली सलामीला आलेले नाशिर जमशेद १ व अहमद शहजाद अवघ्या २ धावांवर एकापाठोपाठ एक बाद झाले. परंतू त्यानंतर आलेल्या यूनुस खान व सोहेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यूनुसने १९, सोहेलने ३३, उमर अकमलने ६५, शोएब मकसूदच्या २० धावांबरोबरच मिसबाह उल हकने केलेल्या ९१ धावांच्या नाबाद खेळीमुळे पाकिस्तानला इंग्लंडवर विजय मिळविता आला.
वर्ल्डकप सराव सामन्यात पाकचा विजय
By admin | Updated: February 11, 2015 16:59 IST