शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची शानदार फलंदाजी, भारतासमोर 339 धावांचं आव्हान

By admin | Updated: June 18, 2017 19:00 IST

बेभरवशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शानदार फलंदाजीचं प्रदर्शन करताना भारतासमोर

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - बेभरवशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शानदार फलंदाजीचं प्रदर्शन करताना भारतासमोर 339 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सलामीवीर फखर जमानने झळकावलेल्या शानदार शतकाने पाकिस्तानसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.  फखरने 106 चेंडूत 114 धावा फटकावल्या. अखेर 34 व्या षटकात हार्दिक पांड्याने त्याला रविंद्र जडेजाकरवी झेलबाद केलं.
 
याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीची काही षटकं भारतीय गोलंदाजांनी चांगली टाकली, ज्यात पाकिस्तानचे फलंदाज चाचपडताना दिसले. मात्र त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला आणि भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. भारताकडून भुवनेश्वरने चांगली गोलंदाजी केली मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. भुवनेश्वर, जाधव आणि पांड्या यांनी प्रत्येकी  एक गडी बाद केला तर एक फलंदाज धावचीत झाला.
 
 त्यापुर्वी फखर जमानसोबत सलामीसाठी आलेल्या अझहर अलीनेही महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.  दोन्ही सलामीवीरांनी शानदार अर्धशतक झळकावत पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली मात्र 23 व्या षटकात अर्धशतकवीर अझहर अली याला धावचीत करण्यात भारताला यश आलं. त्याने 71 चेंडूत 59 धावा काढल्या. याशिवाय पाकिस्तानकडून शोएब मलिकने 12 धावा  आणि बाबर आझमने 46 धावा केल्या. त्यांच्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अर्धशतकवीर मोहोम्मद हाफिझ (57) आणि  इमाद वासिमने(25) झटपट फलंदाजी करत भारतीय संघासमोर 339 धावांचं आव्हान दिलं.