शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पाकिस्तानी गोलंदाज म्हणतोय, विराटला सहज बाद करेन

By admin | Updated: May 28, 2017 11:20 IST

चार तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान भिडणार आहेत. पण त्यापूर्वीच स्लेजिंगला सुरुवात झाल्याचे दिसतेय. पाकिस्तानी खेळाडूने भारतीय कर्णधार विराटला टार्गेट करत वातावरण गरम केले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - चार तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान भिडणार आहेत. पण त्यापूर्वीच स्लेजिंगला सुरुवात झाल्याचे दिसतेय. पाकिस्तानी खेळाडूने भारतीय कर्णधार विराटला टार्गेट करत वातावरण गरम केले आहे. एकीकडे विराटने पाकिस्तानी संघाला जास्त भाव न देता इतर संघाप्रमाणे लेखले असताना पाक संघातील खेळाडू मात्र त्याला टार्गेट करत असल्याचे दिसतेय. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह आता विराटला डिवचले आहे पाक संघातील खेळाडूने. पाकिस्तानचा तेज गोलंदाज जुनेद खान याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टिकोनातून ही सुरुवात केली आहे. किस्तान मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, रताचा कर्णधार विराट कोहली तल्लख फलंदाज आहे; पण माझ्यापुढे त्याची डाळ शिजत नाही. अर्थात याला कारणही तसे आहे; कारण डावखुऱ्या जुनेदने चारपैकी तीनवेळा कोहलीची विकेट काढली आहे. हलीच्या हक्काच्या घरच्या प्रेक्षकांपुढे मी त्याच्या दांड्या गुल केल्या होत्या. मग इंग्लंडमध्ये मला त्याची विकेट अगदी सहज मिळेल, असे जुनेद म्हणाला.

विराटला डिवचणाऱ्या जुनेदला काल झालेल्या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगलेच धुतले. हे आवर्जून नमूद करावे लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात जुनेदच्या नऊ षटकांमध्ये 73 धावा तडकावण्यात आल्या. कोहलीने जुनेदचा सामना करून चार वर्षांचा कालावधी लोटला आहे; पण तरीदेखील 4 जूनच्या सामन्यात आपलाच वरचष्मा असेल, असे जुनेद ठणकावून सांगतो. मी कोहलीला बऱ्याचदा बाद केल्याने तो आताही माझ्यापासून बिचकूनच राहील. माझ्याविरुद्ध सावध पवित्रा घेतल्याने तो सहज विकेट गमावून बसेल, असे जुनेदचे म्हणणे आहे. 27 वर्षांच्या जुनेदच्या मते कोहलीच काय; पण भारताच्या फलंदाजांना त्याच्या चेंडूंवर चौकार मारता आलेला नाही. ही बाब त्याला अभिमानास्पद वाटते. कोहली व त्याच्या सहकाऱ्यांनी जगातील मैदानांवर सहज फटकेबाजी केली आहे. गोलंदाजांसाठी ते दुःखद स्वप्न ठरतात; पण माझ्याविरुद्ध त्यांना चौकार वसूल करता आलेला नाही. हा मी माझा मान समजतो.