शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पाक संघ भारतात दाखल

By admin | Updated: March 13, 2016 04:24 IST

शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ आयसीसी विश्वकप टी-२० स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शनिवारी सायंकाळी कोलकात्यामध्ये दाखल झाला.

कोलकाता : शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ आयसीसी विश्वकप टी-२० स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शनिवारी सायंकाळी कोलकात्यामध्ये दाखल झाला. पाक संघाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडक सुरक्षाव्यवस्था होती. पाकिस्तान संघ अबुधाबीमार्गे कोलकात्यामध्ये दाखल झाला. पाकिस्तान संघात १५ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या १२ सदस्यांचा समावेश आहे. त्याआधी, पाक संघ कडक सुरक्षाव्यवस्थेत कराचीच्या अलामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला आणि अबुधाबीसाठी रवाना झाला. शुक्रवारी भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंहांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कोलकाता पोलीस विभागाने सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार खान यांनी पाकच्या राष्ट्रीय संघाला भारतात जाण्यास मंजुरी दिली. भारताकडे रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक वकार युनूस यांनी टिष्ट्वटरवर त्याची माहिती दिली. वकारने टिष्ट्वट केले, की विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्ही भारतात जात आहोत. जर आम्ही स्पर्धेतून माघार घेतली असती, तर विश्वक्रिकेटवर त्याचा वाईट परिणाम झाला असता. आता स्थिती पूर्वीच्या तुलनेत चांगली झाली असून, उभय देशांनी स्थिती सावरण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार भारत-पाक लढत १९ मार्च रोजी धरमशालामध्ये होणार होती; पण सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ही लढत कोलकात्यामध्ये स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाक संघ उशिरा दाखल झाल्यामुळे त्यांचा शनिवारी बंगाल रणजी संघासोबत होणारा सराव सामना रद्द करण्यात आला.आम्हाला अद्याप एक सराव सामना खेळण्याची संधी आहे. श्रीलंकेविरुद्धचा सराव सामना राऊंड रॉबिन फेरीच्या पार्श्वभूमीवर आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यात आम्ही चमकदार कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहोत. भारतात आमचा चांगला पाहुणचार होतो, याची आम्हाला कल्पना आहे. पाकचे खेळाडू आणि अधिकारी वारंवार भारत दौऱ्यावर असतात. सुरक्षेचा मुद्दा आम्ही बोर्डावर सोडलेला असून, या वादाचा आमच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही. आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करण्यास प्रयत्नशील आहोत.- वकार यूनीस