शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून पाक-श्रीलंका वनडे सिरीज

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता पाकिस्तान आजपासून सुरू होणाऱ्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला पराभूत करून २०१७मध्ये होणाऱ्या

दाम्बुला : कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता पाकिस्तान आजपासून सुरू होणाऱ्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला पराभूत करून २०१७मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपला प्रवेश निश्चित करण्याच्या निर्धाराने मैदानात पाऊल ठेवेल.मिसबाह उल हक याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने कसोटी मालिका २-१नी जिंकली. पाकिस्तानने पाल्लेकल येथील अखेरच्या कसोटी सामन्यात विजयासाठी ३७७ धावांचे लक्ष्य फक्त ३ गडी गमावून पूर्ण केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना हा सर्वांत मोठा सहाव्या क्रमांकाचा विजय आहे.या कसोटीत युनीस खानने नाबाद १७१, सलामीवीर शॉन मसूदने १२५ आणि मिसबाहने नाबाद ५९ धावा केल्या. तथापि, हे तिन्ही फलंदाज वनडे मालिकेत दिसणार नाहीत. मिसबाहने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर युनीस आणि मसूद यांची वनडेसाठी निवड झालेली नाही.आघाडीचा फलंदाज अजहर अली आयसीसी क्रमवारीत नवव्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तानी संघाचा कर्णधार असेल. पाकिस्तानला इंग्लंडमध्ये होणाऱ्या ८ देशांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ही मालिका जिंकणे आवश्यक आहे.अजहर म्हणाला, ‘‘आमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण मालिका आहे आणि आम्ही जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. अधिकांश खेळाडूंना श्रीलंकेत खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.’’तथापि, पाकिस्तानची गेल्या काही काळातील वनडेतील कामगिरी तेवढी चांगली नाही. त्यांना वर्ल्डकप उपांत्यपूर्व फेरीत यजमान आॅस्ट्रेलियाने पराभूत केले. त्यानंतर एप्रिलमध्ये बांगलादेशाने त्यांचा ३-० असा सफाया केला. तथापि, दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी २-० असा विजय मिळविला. पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज मोहंमद इरफानचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. तथापि, वहाब रियाज दुखापतीमुळे बाहेर आहे, तसेच फिरकी गोलंदाज हॅरिस सोहेलच्या गुडघ्याला दुखापत आहे. दुसरीकडे, श्रीलंका माहेला जयवर्धने आणि कुमार संघकारा निवृत्त झाल्यानंतर पहिली वनडे मालिका खेळत आहे. वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या श्रीलंकन संघात मिलिंदा सिरिवर्धना आणि सचित पतिराना या दोन नव्या अष्टपैलू खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.