शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

पाकने विश्वकप स्पर्धेवर बहिष्कार टाकू नये

By admin | Updated: December 13, 2015 23:18 IST

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला मंजुरी देण्यासाठी भारतातर्फे उशीर होत असला तरी पीसीबीने पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात

कराची : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला मंजुरी देण्यासाठी भारतातर्फे उशीर होत असला तरी पीसीबीने पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात भारतात होणाऱ्या विश्व टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार करू नये, असा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने बोर्डाला दिला आहे. अक्रम म्हणाला, ‘‘भारत पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकेबाबत निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ घेत आहे. पण ही मालिका आता झाली नाही तरी भविष्यात लवकरच होईल, अशी आशा आहे. भारतीय बोर्डाने खेळण्यास इच्छुक आहे किंवा नाही, याबाबत स्पष्ट उत्तर द्यायला हवे. त्यामुळे हा मुद्दा निकाली निघेल.’’दरम्यान, पाकिस्तानने कुठल्याही परिस्थितीत विश्व टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याबाबत विचार करू नये, असेही अक्रम म्हणाला.अक्रमने सांगितले, ‘विश्व टी-२० आयसीसीची स्पर्धा असून यात कुठल्याही परिस्थितीत खेळणे आवश्यक आहे. जर आम्ही असे केले नाही तर प्रदीर्घ कालावधीपर्यंत नुकसान सोसावे लागेल.’पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान म्हणाले होते, की पीसीबी विश्व टी-२० स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवण्यापूर्वी सरकारकडून सुरक्षेची हमी मागणार आहे.अक्रम म्हणाला, ‘भारतात मला तसेच प्रेम मिळाले जसे पाकिस्तानमध्ये सचिन तेंडुलकरला मिळाले.’(वृत्तसंस्था)विश्व टी-२० स्पर्धेत न खेळल्यामुळे आमच्या खेळाडूंवर आणि आमच्या क्रिकेटवर परिणाम होईल. भारत आमच्यासोबत खेळण्यास इच्छुक नाही तर कुठली अडचण नाही. आम्ही त्यांच्यासोबत न खेळताही जीवन जगू शकतो. आम्ही खेळलो किंवा नाही खेळलो तरी त्यामुळे दहशतवादाची समस्या संपणार नाही.- वसीम अक्रम, माजी कर्णधार, पाकिस्तान