शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी पाकची तयारी

By admin | Updated: May 11, 2015 02:27 IST

भारताविरुद्ध डिसेंबर महिन्यात युएईमध्ये मालिकेचे आयोजन करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तयारी आहे,

कोलकाता : भारताविरुद्ध डिसेंबर महिन्यात युएईमध्ये मालिकेचे आयोजन करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तयारी आहे, असे भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान क्रिकेट संबंध सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असलेले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांनी सांगितले. या मालिकेत तीन कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असेल. उभय देशांच्या क्रिकेट बोर्डांदरम्यान २०१४ मध्ये झालेल्या करारामध्ये या मालिकेचा समावेश होता. शहरयार आता हा करार पूर्ण करण्यास प्रयत्नशील आहेत.बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शहरयार म्हणाले, ‘आम्ही युएईमध्ये भारत-पाक मालिका पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहोत. भारत व पाकिस्तानदरम्यान नव्याने क्रिकेटला सुरुवात होईल. ही मालिका पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार डिसेंबरमध्ये होणार असून त्यात तीन कसोटी, पाच वन-डे व दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश राहील. आता आम्हाला अखेरचा अडथळा पार करावा लागणार आहे.’प्रतिस्पर्धी क्रिकेट संघांदरम्यानची मालिका नव्याने सुरू करणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष दालमिया यांची शहरयार यांनी प्रशंसा केली. दालमिया यांच्यासोबत जुने संबंध असल्याचे शहरयार यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दालमिया यांनी उभय देशांदरम्यान क्रिकेट संबंध पुन्हा सुरू होण्याची आशा व्यक्त करताना चेंडू सरकारच्या कोर्टात टोलवला.दालमियांचे वक्तव्यपाकिस्तान क्रिकेटने घेतलेल्या या पुढाकाराविषयी बोलताना दालमिया म्हणाले,‘आम्हाला मालिका नव्याने सुरू होण्याची आशा आहे. काही बाबींवर तोडगा निघणे आवश्यक आहे. सर्वांच्या सहमतीशिवाय पुढे पाऊल टाकणे कठीण आहे. गृहमंत्रालय व सरकारचा पाठिंबा मिळाल्याशिवाय आम्ही पुढचे पाऊल उचलू शकत नाही.’