पहिली कसोटी : 3 बाद 566 धावांर्पयत मजल, युनूस, मिसबाह यांचे शतक
अबुधाबी : अहमद शहजादने (176) केलेल्या कारकिर्दीतील सर्वोच्च खेळीनंतर युनूस खान (नाबाद 100) आणि मिसबाह उल हक (नाबाद 102) यांच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत दुस:या दिवशी 3 बाद 566 धावांवर आपला डाव घोषित केला़ दुस:या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने बिनबाद 15 धावांर्पयत मजल मारली होती़
पाकच्या अहमद शहजादने आपल्या खेळीत 371 चेंडूंचा सामना करताना 17 चौकार आणि 1 षटकार लगावला, तर युनूस खान याने 141 चेंडूंना सामोरे जाताना 1क् चौकार खेचल़े विशेष म्हणजे युनूसचे हे गत पाचव्या डावातील हे चौथे शतक ठरले आह़े मिसबाहने 162 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार आणि 1 षटकार लगावला़ मिसबाहचे सुद्धा तिस:या डावातील हे तिसरे शतक आह़े मिसबाहचे शतक पूर्ण होताच पाकने आपला डाव घोषित केला़
प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दिवसअखेर बिनबाद 15 धावा केल्या होत्या़ किवी संघ अद्यापही 551 धावांनी मागे आह़े दुस:या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम 9 आणि टॉम लॅथम 5 धावांवर खेळत होता़
त्याआधी पाकने सकाळी 1 बाद 269 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली़ शहजाद आणि अजहर अली (87) यांनी सहज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करताना दुस:या गडय़ासाठी 169 धावांची भागीदारी रचली़ शहजादने याआधी सलामीवीर फलंदाज मोहंमद हाफीज (96) सोबत 178 धावांची भागीदारी रचली होती़
पाकिस्तानने पहिल्या सत्रत शहजादची विकेट गमावली आणि उपाहारार्पयत 2 बाद 347 धावांर्पयत मजल मारली होती़ पाकच्या अजहर अलीला आपले शतक पूर्ण करता आले नाही़ तो त्रिफळाचीत होऊन माघारी परतला़ यानंतर युनूस खान आणि मिसबाह यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत पाकला पाचशेचा आकडा पार करून दिला़
या दोन्ही खेळाडूंनी एकाच षटकात आपापली शतके पूर्ण केली़ न्यूझीलंडकडून कोरी अँडरसन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला़ त्याने 68 चेंडूंत 2 गडी बाद केले, तर फिरकी गोलंदाज ईश सोढी याने 162 धावांत 1 बळी मिळविला़ (वृत्तसंस्था)
धावफलक
पाकिस्तान : पहिला डाव : 17क़्5 षटकांत 3 बाद 566़ (मोहंमद हाफीज 96, अहमद शहजाद 176, अझहर अली 87, युनूस खान नाबाद 1क्क्, मिसबाह उल हक नाबाद 1क्2़ कोरी अँडरसन 2/68, ईश सोढी 1/162)़ न्यूझीलंड : पहिला डाव : 7 षटकांत बिनबाद 15 धावा़ (टॉम लॅथम नाबाद 5, ब्रँडन मॅक्युलम नाबाद 9)़