शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाकची बांगलादेशवर मात

By admin | Updated: March 17, 2016 03:52 IST

शाहीद आफ्रिदीच्या (१९ चेंडूंत ४९ धावा व २ बळी) अफलातून अष्टपैलू खेळीच्या बळावर पाकिस्तानने बांगलादेशला ५५ धावांनी नमवीत विजयी सलामी दिली.

कोलकाता : शाहीद आफ्रिदीच्या (१९ चेंडूंत ४९ धावा व २ बळी) अफलातून अष्टपैलू खेळीच्या बळावर पाकिस्तानने बांगलादेशला ५५ धावांनी नमवीत विजयी सलामी दिली. ईडन गार्डन येथे हा सामना झाला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजी स्वीकारली. अहमद शेहझाद, मोहम्मद हाफीज यांची अर्धशतकी खेळी व शाहीद आफ्रिदीच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ५ बाद २०१ धावा टोलावल्या. विजयासाठी २०२ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या बांगलादेशचा डाव २० षटकांत ६ बाद १४६ धावांत संपुष्टात आला. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या प्रतिकारामुळे पाकिस्तानला बांगलादेशचा डाव गुंडाळता आला नाही. तमिम इक्बाल (२० चेंडूंत २४), साबिर रेहमान (१९ चेंडूंत २५), मुशफिकुर रहीम (१८) फार मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. शकिब अल हसन याने ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार टोलावत ५० धावांची नाबाद खेळी करून काहीशी झुंज दिली. तर, मशरफी मुर्तझाने ९ चेंडूंत २ चौकार व १ षटकार फटकावीत नाबाद १५ धावा केल्या. शाहीद आफ्रिदी व मोहम्मद आमीरने प्रत्येकी २, तर मोहम्मद इरफान याने एक बळी घेतला. तत्पूर्वी सालमीवीर शारजील खान (१८) झटपट बाद झाल्यानंतर अहमद शेहझाद व मोहम्मद हाफीज यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागिदारी केली. शेहझादने ८ चौकारांच्या साहाय्याने ३९ चेंडूंत ५२ धावा, तर मोहम्मद हाफीजने ७ चौकार व २ षटकारांच्या साहाय्याने ४२ चेंडूंत ६४ धावा टोलावल्या. शेहझाद तंबूत परतल्यानंतर आलेल्या शाहीद अफ्रिदीने तडाखेबंद फलंदाजी करीत अवघ्या १९ चेंडूंत ४९ धावा टोलावल्या. त्याने ४ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करीत आपली खेळी साजरी केली. धावफलक : पाकिस्तान : २० षटकांत ५ बाद २०१, शरजील खान १८ त्रि.गो. अराफत सनी, अहमद शेहझाद झे. महमुदुल्लाह गो. साबिर रहमान ५२, मोहम्मद हाफीज झे. सौम्या सरकार गो. अराफत सनी ६४, शाहीद अफ्रिदी झे. महमदुल्लाह गो. तस्कीन अहमद ४९, शोएब मलिक नाबाद १५.बांगलादेश : २० षटकांत ६ बाद १४६, तमिम इक्बाल झे. इमाद वसिम गो. शाहीद आफ्रिदी २४, साबिर रहमान त्रि. गो. शाहीद आफ्रिदी २५, शाकिब अल हसन नाबाद ५०, मशरफी मुर्तझा नाबाद १५