शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा विजयरथ रोखण्यात पाक यशस्वी ठरेल?

By admin | Updated: March 13, 2016 04:18 IST

पाकिस्तान संघ विश्वकप टी-२० स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले असून, परंपरागत प्रतिस्पर्धी संघ विश्वकप स्पर्धेत टीम इंडियाविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करण्यात यशस्वी ठरेल का

नवी दिल्ली : पाकिस्तान संघ विश्वकप टी-२० स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले असून, परंपरागत प्रतिस्पर्धी संघ विश्वकप स्पर्धेत टीम इंडियाविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करण्यात यशस्वी ठरेल का, याबाबत उत्सुक आहे. पाकिस्तान संघाला यंदाच्या टी-२० विश्वकप स्पर्धेत भारताविरुद्ध १९ जून रोजी धरमशालामध्ये साखळी लढतीत खेळायचे होते, पण पाकिस्तानने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे ही लढत कोलकाता येथील ईडन गार्डनवर स्थानांतरित करण्यात आली. पाक संघाची ईडन गार्डनवरील कामगिरी टीम इंडियाची चिंता वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते. भारताने २०१२च्या टी-२० विश्वकप स्पर्धेत साखळी फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता. ईडन गार्डनमध्ये पहिला वन-डे सामना १८ जानेवारी १९८७ रोजी खेळला गेला. त्यात पाकिस्तानने दोन गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर २८ आॅक्टोबर १९८९ रोजी पाकिस्तानने भारताचा ७७ धावांनी तर १३ नोव्हेंबर २००४ रोजी ६ गडी राखून विजय मिळवला होता. ३ जानेवारी २०१३ रोजी पाकिस्तानने भारताविरुद्ध ८५ धावांनी विजय मिळवला होता. ईडन गार्डनवर आतापर्यंत केवळ दोन टी-२० सामने खेळले गेले असून, त्यात एका लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे, तर एक सामना रद्द झाला होता. आफ्रिदीची रविवारी पत्रकार परिषदकोलकाता : आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात येत असलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी रविवारी कोलकातामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले की, कोलकातामध्ये ताज बंगाल हॉटेलमध्ये आफ्रिदी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. आफ्रिदीनंतर पाकिस्तान संघातील चार खेळाडू ओपन मीडिया सत्रासाठी उपलब्ध राहतील.