शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या तुलनेत पाक खेळाडूंचे मानधन तुटपुंजे

By admin | Updated: July 13, 2017 12:48 IST

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने 2017-18 साठी आपल्या 35 खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला आहे. भारतीय खेळाडूंचा विचार करता पाकिस्तानच्या खेळाडूंना अल्प मानधन देण्यात आल्याचे चित्र दिसतेय

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - पाकिस्तान क्रिकेट मंडळाने 2017-18 साठी आपल्या 35 खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला आहे. भारतीय खेळाडूंचा विचार करता पाकिस्तानच्या खेळाडूंना अल्प मानधन देण्यात आल्याचे चित्र दिसतेय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहिर केलेल्या करारातून मधल्या फळीतील फलंदाज उमर अकमलला वगळण्यात आले आहे. पाकिस्ताननं भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला बीसीसीआयकडून अ, ब आणि क गटातील खेळाडूंचे मानधन दुप्पट केले होते. अ गटातील खेळाडूंना 2 कोटी, ब गटातील खेळाडूंना 1 कोटी, तर क गटातील खेळाडूंना 50 लाख रुपये मानधन देण्याचे बीसीसीआयने जाहीर केले होते. तसेच बीसीसीआय प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख , एकदिवसीयसाठी 6 लाख आणि टी-20 साठी 3 लाख इतके मानधन देण्याचेही जाहीर केले होते. हा झाला भारतीय खेळाडूंना मिळणारा वार्षिक पगार पण तुम्हाला आता चॅम्पियन झालेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंचा वार्षिक पगार माहित आहे का? पाकच्या खेळाडूंचा पगार वाचून बीसीसीआचा तुम्हाला आभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. 

भरतनाट्यम डान्सर बनण्याचं होतं मितालीचं स्वप्न
धावांच्या एव्हरेस्टवर मिताली ‘राज’!
   
मिताली राजला शुभेच्छा देताना विराट कोहलीची झाली "गोची"
पीसीबीच्या सध्याच्या करारपद्धतीनुसार "अ" श्रेणीतील खेळाडूंना साडेसहा लाख रुपये पगार आहे. पाक चलनानुसार त्यांचे वार्षिक मानधन 78 लाख रुपये आहे. तेच मानधन भारतीय चलनानुसार 48 लाख रुपये होतं. अ श्रेणीतील भारतीय खेळाडूंचे वार्षिक मानधन 2 कोटी रुपये आहे. भारत आणि पाक खेळाडूंच्या अ श्रेणीतील मानधनात चारपट फरक दिसून येतो. ब वर्गासाठी पाकिस्तानी खेळाडूंना वर्षाला 54 लाख (पाक चलनानुसार) रुपये दिले जाते. भारतीय चलनानुसार याची किंमत 33 लाख रुपये होतीय. भारतातील ब श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जाते. म्हणजे ब गटातील भारतीय खेळाडूंचे मानधन पाक खेळाडूंपेक्षा तीनपट आहे. क वर्गासाठी पाकिस्तान आपल्या खेळाडूंना वर्षाला 31 लाख रुपये मानधन देते. भारतीय चलनानुसार 19 लाख रुपये. बीसीसीआय भारतातील क श्रेणीतील खेळाडूंना 50 लाख रुपये मानधन देते. इथेही भारतीय खेळाडूंना पाक खेळाडूंच्या तीनपट अधिक मानधन मिळतेय.