सिडनी : पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ग्रांट लुडेन यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे़ पाक संघातील ३ खेळाडूंनी केलेल्या असभ्य वर्तनामुळे लुडेन यांनी हा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे सलामीच्या सामन्यात भारताकडून पराभूत झालेला पाक संघ अडचणीत सापडला आहे़ सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, पाक संघ व्यवस्थापनाने लुडेन यांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे़
पाक फिल्डिंग प्रशिक्षकाचा राजीनामा?
By admin | Updated: February 19, 2015 02:36 IST