पाक- इंग्लंड
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
पाकच्या विजयात मिस्बाह चमकला
पाक- इंग्लंड
पाकच्या विजयात मिस्बाह चमकलाइंग्लंडवर चार गड्यांनी मातसिडनी : कर्णधार मिस्बाह उल हक याच्या नाबाद (९१ धावा) खेळीच्या बळावर पाकने विश्वचषक सराव सामन्यात बुधवारी इंग्लंडला चार गड्यांनी पराभवाची चव चाखवली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करीत ज्यो रुटच्या ८५ धावांमुळे ८ बाद २५० धावा केल्या. पण, मिस्बाहने ९९ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह नाबाद ९१ धावांची खेळी करताच पाकचा विजय ४८.५ षटकांत ६ बाद २५२ असा साकार झाला. मिस्बाहने ४ बाद ७८ अशा नाजूक स्थितीत खेळाची सूत्रे स्वीकारली. त्याने विकेटकीपर उमर अकमलसोबत (६३ धावा, तीन चौकार, तीन षटकार) पाचव्या गड्यासाठी १३३ धावांची विजयी भागीदारी केली. सोहेलने ३३ आणि सोहेब मकसूदने २० धावा केल्या. इंग्लंडकडून ॲण्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.इंग्लंडच्या डावात गॅरी बॅलेन्स ५७, रुट ८५ यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज खेळपीवर स्थिरावले नाहीत. पाककडून लेगस्पिनर यासिर शाह याने ४५ धावा देत तीन गडी टिपले. मध्यम जलद गोलंदाज सोहेल खान याने दोन, तसेच एहसान आदील, वहाब रियाज व शाहीद आफ्रिदी यांनी एकेक गडी बाद केला. (वृत्तसंस्था).....................................................