शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

पेस-हिंगीस अंतिम फेरीत

By admin | Updated: January 31, 2015 03:36 IST

भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये आपली विजयी घोडदौड कायम

मेलबोर्न : भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखताना मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये मजल मारली;मात्र भारताची स्टार महिला खेळाडू सानिया मिर्झा हिला ब्राझीलच्या ब्रुनो सोरेससह पराभवाचे तोंड पाहावे लागले़ सातवे मानांकन प्राप्त पेस आणि हिंगीस या जोडीने जबरदस्त खेळ करताना बेस लाईन आणि नेटवर अप्रतिम फटके लगावून उपांत्य फेरीच्या लढतीत उरुग्वेचा पाब्लो कुएवास आणि चिनी तैपेईचा सु वेई सीह जोडीवर सरळ सेटमध्ये ७-५, ६-४ अशा फरकाने मात करीत थाटात फायनलमध्ये प्रवेश केला़ पेस आणि हिंगीस या जोडीने आपला मुकाबला १ तास १४ मिनिटांत आपल्या नावे केला़ विजयी जोडीने ३३ विनर्स आणि ८ पैकी तीन ब्रेक गुणांची कमाई केली़ पेसने २००३ आणि २०१० मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनचा मिश्र दुहेरीचा किताब पटकावला होता़ आता तो आपल्या तिसऱ्या किताबापासून एक पाऊल दूर आहे़ दुसऱ्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सानिया आणि सोरेस या तृतीय मानांकन प्राप्त जोडीला फ्रान्सची क्रिस्टिना म्लादेनोविच आणि कॅनडाचा डॅनियल नेस्टर यांच्याकडून अटीतटीच्या लढतीत ३-६, ६-२, १०-८ अशा फरकाने मात खावी लागली़ सानिया आणि सोरेस यांनी पहिला सेट ६-३ ने सहज आपल्या नावे केला; मात्र पुढचा सेट त्यांना २-६ ने गमवावा लागला़ सुपर टायब्रेकरमध्ये दोन्ही जोड्यांमध्ये चांगलीच टक्कर झाली; मात्र अखेर म्लादेनोविच आणि नेस्टर यांनी हा १०-८ ने जिंकत अंतिम फेरीत जागा मिळविली़२००९ मध्ये या स्पर्धेच्या फायनलमध्ये सानियाला रोमानियाच्या होरिया टेकाऊसह पराभवाचा सामना करावा लागला होता;मात्र या वेळी उपांत्य फेरीत सानियाला गाशा गुंडाळावा लागला़ सानिया आणि सोरेस यांनी गतवर्षी मात्र अमेरिकन ओपनचा किताब आपल्या नावे केला होता़ (वृत्तसंस्था)