शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भारताचे दोन अ‍ॅथलिट स्पर्धेबाहेर, सीजीएफच्या निर्णयाला भारत देणार आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 02:02 IST

‘नो नीडल पॉलिसी’चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून भारताच्या दोन अ‍ॅथलिट्सना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

गोल्ड कोस्ट : ‘नो नीडल पॉलिसी’चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून भारताच्या दोन अ‍ॅथलिट्सना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. वॉकथॉनपटू के. टी. इरफान आणि तिहेरी उडीतील व्ही. राकेशबाबू अशी बाहेर करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे आहेत. या दोघांनाही मायदेशी परत पाठविण्यात आले आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने याप्रकरणी चौकशी सुरू केली असून भारतीय आॅलिम्पिक संघटनेने(आयओए) राष्टÑकुल क्रीडा महासंघाच्या निर्णायाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.सीजीएफ अध्यक्ष लुई मार्टिन यांनी राकेशबाबू आणि इरफान यांना तात्काळ प्रभावाने स्पर्धेबाहेर काढल्याची घोषणा केली. दोघांचेही अ‍ॅक्रिडेशन १३ एप्रिलला सकाळी ९ वाजेपासून रद्द करण्यात आले. दोघांनाही क्रीडाग्राममधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. दोन्ही खेळाडू तात्काळ विमानाने परत जातील याची खात्री करण्यास भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनला सांगितले आहे. एएफआयने चौकशी सुरू केली असून खेळाडू दोषी आढळल्यास कठोर शिक्षा होईल, असे सांगितले. इरफानची २० किमी पायी चालण्याची शर्यत आटोपली आहे. तो १३ व्या स्थानी होता. राकेशबाबूने तिहेरी उडीत पात्रता फेरीत १२ व्या स्थानासह अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. हे डोपिंग प्रकरण नसल्याचेही सीजीएफने स्पष्ट केले. याआधी, एका भारतीय बॉक्सरच्या खोलीत सूई आढळल्याने स्पर्धा सुरू होण्याआधी फजिती झाली होती. काल सीजीएफ वैद्यकीय आयोगाची नोटीस मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (वृत्तसंस्था)>निर्णयाला आव्हान देणार‘‘आम्ही काही निर्णयाच्या विरोधात आहोत. आपल्या सिनियर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आव्हान देणार आहोत. आमच्या खेळाडूंवर संशयापोटी बंदी घालण्यात आली आहे.’’- नामदेव शिरगावकर, भारतीय पथकाचे व्यवस्थापक.एएफआय अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी साईचे माजी सचिव बी. के. सिन्हा यांच्या नेतृत्वात होईल. समितीत एक डॉक्टर आणि अधिकाºयाचा समावेश असेल. क्लीन स्पोर्टस् इंडियाचे समन्वयक बीव्हीपी राव म्हणाले,‘हे प्रकरण भारताला बदनाम करणारे असल्याने सविस्तर चौकशी व्हावी. क्रीडा मंत्रालय आणि पंतप्रधानांनी दोषींवर कठोर कारवाई करायला हवी.’>आजचे महत्त्वाचे सामनेनेमबाजी : पुरूष ५० मीटर रायफल थ्री पोझीशन - चैन सिंह, संजीव राजपूत, पुरुष ट्रॅप - केनान चेनाई, मानवजीत सिंह संधू,अ‍ॅथलेटिक्स - भाला फेक नीरज चोप्रा, विपीन कसाना, तिहेरी उडी पुरूष - अरपिंदर सिंह, १५०० मीटर अंतिम फेरी जिनसन जानसन, महिला चार बाय ४०० मीटर रिले. पुरूष चार बाय ४०० मीटर रिले.हॉकी कांस्य पदक लढत - भारत विरुद्ध इंग्लंड (महिला व पुरुष)महिला ४८ किलो मुष्टियुद्ध फायनल - मेरी कोम, पुरूष ४९ किलो अमित फांगल, ५२ किलो - गौरव सोलंकी, पुरूष ६० किलो मनिष कौशिक, पुरूष ७५ किलो - विकास कृष्णन, पुरूष ९१ किलो - सतीश कुमार वि. फ्रेजर क्लार्क.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८