शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

बोपन्ना बाहेर

By admin | Updated: December 23, 2016 01:28 IST

अमेरिकन ओपनचा माजी उपविजेता व दोन वेळेचा आॅलिम्पियन रोहन बोपन्ना हा न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात होणाऱ्या डेव्हिस

नवी दिल्ली : अमेरिकन ओपनचा माजी उपविजेता व दोन वेळेचा आॅलिम्पियन रोहन बोपन्ना हा न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीत खेळणार नाही. एआयटीएच्या निवड समितीने बोपन्नाला बाहेर केले असून लियांडर पेस आणि साकेत मिनेनी यांना पसंती दिली.स्पेनविरुद्ध मागील डेव्हिस चषक सामन्यात राफेल नदाल आणि मार्क लोपेझ यांच्याविरुद्ध दोघांनीही चमकदार खेळ केला होता. उलट लियांडर आणि रोहनसोबत खेळले तेव्हा कामगिरी ढेपाळली हा अनुभव आहे.बोपन्ना एटीपी पुरुष रँकिंगमध्ये २८, पेस ५९ आणि मिनेनी २१० व्या स्थानावर आहे. राष्ट्रीय निवडकर्ते मिश्रा म्हणाले, ‘रोहनला संघात ठेवले असते तर एकेरीच्या तिसऱ्या खेळाडूची निवड होऊ शकली नसती. लियांडरच्या सोबतीने साकेतने नेहमी चांगलाच खेळ केला आहे.’ लियांडर हा ४३ वर्षांचा असूनही ३६ वर्षांच्या रोहनच्या तुलनेत सरस खेळाडू असल्याकडे मिश्रा यांनी लक्ष वेधले.सोमदेवबाबत मिश्रा म्हणाले, ‘दीर्घ काळापासून तो स्पर्धा खेळला नाही. त्याला कोर्टवर पुनरागमन करीत चांगला खेळ करावा लागेल.’न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघात युकी भांबरीचे पुनरागमन झाले. मिनेनी तसेच रामकुमार रामनाथन हे दोघे संघात कायम आहेत. युकीचे आत येणे याचा अर्थ सुमित नागल संघाबाहेर होणे असा आहे. संघात पाचवा खेळाडू डावखुरा प्रजनेश गुणेश्वरन हा आहे. दोन युवा टेनिसपटू आदिल कल्याणपूर आणि नितीन कुमार सिन्हा हे संघासोबत सराव करीत असल्याने फार अनुभवी होणार आहेत. महेश भूपती भारताचा नॉन प्लेअर कर्णधारमहान टेनिसपटू महेश भूपती हा भारतीय डेव्हिस चषक टेनिस संघाचा बिगर खेळाडू कर्णधार बनला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान होणारी आशिया-ओसियाना ग्रुप-१ची लढत सध्याचा बिगर खेळाडू कर्णधार आनंद अमृतराज याची अखेरची लढत असेल. ४एआयटीए महासचिव हिरण्यमय चॅटर्जी म्हणाले, ‘प्रत्येकाला कर्णधार बनण्याची संधी मिळायला हवी. कुठलेही पद एका व्यक्तीसाठी नसते. मी महेशला विचारणा करताच त्याने पद स्वीकारण्याची तयारी दाखविली. आम्ही आनंदला विजयी निरोप देऊ इच्छितो.’ अमृतराज हे या निर्णयावर खूश आहेत काय, असे विचारताच ते म्हणाले, ‘कुणीही पदावरून पायउतार होऊ इच्छित नाही, पण प्रत्येकाला संधी मिळायलाच हवी.’४खेळाडूंना याबाबत विश्वासात घेतले का, असा सवाल करताच ते म्हणाले, ‘आम्हाला खेळाडूंचा सल्ला घेण्याची गरज नाही. नेतृत्व कोणी करावे याबद्दल खेळाडूंना विश्वासात घेण्याचे कारण नाही. लियांडर पेस याला देखील आम्ही विचारणा केली नाही.’४लियांडर आणि महेश यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. महेशला कर्णधार बनविल्यामुळे पेसचा पुढचा मार्ग थांबला असे मानायचे काय, असे विचारताच चॅटर्जी म्हणाले, ‘वेळ येताच त्यावर आम्ही निर्णय घेऊ. अमृतराज यांनी खेळाडूंना दिलेली मोकळीक ही देखील कारणीभूत असावी. एआयटीएच्या अधिकाऱ्यांनीही हे कारण फेटाळलेले नाही.’४अमृतराज यांच्याबाबत ते म्हणाले, ‘बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली, पण कुण्या एका खेळाडूला पाठिंब्याबाबत एकही पत्र आलेले नाही. सोमदेव देवबर्मन तसेच रमेश कृष्णन यांच्याकडूनही बिगर खेळाडू कर्णधार बनण्याची इच्छा जाहीर करण्यात आलेली नाही. भूपतीने देखील कुठलीही विशेष मागणी केलेली नाही. त्याला पारिश्रमिक देण्यासंदर्भात विचाराल तर डेव्हिस चषकासाठी देण्यात येणाऱ्या मानधनाची रक्कम त्याला निश्चित दिली जाईल.’