ऑनलाइन टीम
प्रिटोरिया, दि. ११ - 'ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध असलेला धावपटू ऑस्कर पिस्टोरियसने त्याची मैत्रिण रिव्हा स्टीनकॅम्प हिची पूर्वनियोजित हत्या केली नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ऑस्करवरील गंभीर आरोप कमी होण्याची शक्यता आहे.
' ऑस्करने रिव्हाची पूर्वनियोजित हत्या केली हा आरोप सिद्ध होत नसल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले. मात्र असे असले तरी त्याच्या हातून अनवधानाने रिव्हा मारली गेली असल्यास त्या दृष्टीने न्यायाधीश याप्रकरणाकडे पाहणार असून यावर ऑस्करच्या शिक्षेचे अथवा सुटकेचे भवितव्य ठरणार आहे.
२०१३ साली व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी मॉडेल रिव्हा स्टिनकॅम्प हिची हत्या झाली होती व ऑस्करवर तिच्या खुनाचा आरोप लावण्यात आला होता.