शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

रणजी सामन्यांचे तटस्थ स्थळांवर आयोजन फसले

By admin | Updated: January 18, 2017 05:05 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा तटस्थ स्थळांवर रणजी सामन्यांचे आयोजन करण्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा तटस्थ स्थळांवर रणजी सामन्यांचे आयोजन करण्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला. काही आघाडीच्या खेळाडूंच्या मते, यजमान संघटनांची उदासीनता आणि खराब योजनेमुळे ही व्यवस्था निष्क्रिय ठरली. बीसीसीआयने स्पर्धेतील रंजकता वाढविण्यासाठी या योजनेचा वापर केला. स्थानिक संघाला गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळू नये आणि खेळाडूंना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव मिळावा, यासाठी ही योजना राबविण्यात आली होती. स्थानिक क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू रजत भाटिया म्हणाला, ‘ही योजना चांगली होती, पण लागू करण्याची पद्धत चुकीची होती. अनेक यजमान संघटनांनी दुसऱ्या संघांचे सामने आयोजित करण्यास स्वारस्य दाखविले नाही. सुविधा चांगल्या नव्हत्या. चांगल्या खेळपट्ट्या, सरावासाठी पुरेशे चेंडू आणि चांगले भोजन याची वानवा होती. यामध्ये सुधारणा करता आली असती.’दिल्लीचा हा क्रिकेटपटू तीन राज्यांतर्फे खेळलेला आहे. सध्या तो राजस्थानसोबत जुळलेला आहे. कौटुंबिक कारणामुळे यंदाच्या मोसमात केवळ चार सामने खेळणाऱ्या भाटियाने या व्यवस्थेवर कडाडून टीका केली. भाटिया पुढे म्हणाला, ‘आसामविरुद्ध विशाखापट्टणममध्ये आम्ही खेळलेल्या लढतीचे उदाहरण देता येईल. खेळपट्टी प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी अनुकूल नव्हती. त्यामुळे सामना तीन दिवसांत संपला आणि एका आंतरराष्ट्रीय लढतीच्या दोन आठवड्यांपूर्वी हे घडले. ज्यावेळी आम्ही मैदानावरील कर्मचाऱ्याला खेळपट्टीच्या दर्जाबाबत विचारणा केली तर त्याच्याकडे उत्तर देण्यासाठी काहीच नव्हते.’त्या लढतीत वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पंकज सिंगने ९ बळी घेतले आणि राजस्थानने तीन दिवसांमध्ये एक डाव व ८ धावांनी विजय मिळवला. सामन्यांचा कार्यक्रम खेळाडूंसाठी आणखी एक डोकेदुखी ठरली. कारण फारच कमी वेळेत देशाच्या दूरच्या भागात खेळासाठी जावे लागत होते. भारतीय फिरकीपटू व रणजी स्पर्धेत गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करणारा अक्षर पटेल म्हणाला, ‘कार्यक्रम मोठी अडचण होती. सामन्यांमध्ये केवळ तीन दिवसांचे अंतर होते आणि पोहचणे सोपे नसलेल्या स्थळावर आम्हाला पोहचावे लागत होते. त्यामुळे आम्हाला बराच वेळ बसमध्ये घालवावा लागला.’सामन्याकडे प्रेक्षकांनीही पाठ फिरवली. त्यामुळे अक्षर पटेलला तटस्थ स्थळांची कल्पना पटली नाही. अक्षर म्हणाला, ‘प्रेक्षक लाभणार नसलेल्या स्थळांवर सामन्यांचे आयोजन करण्याला काहीच अर्थ नसतो. ज्यावेळी आम्ही गृहमैदानावर खेळतो त्यात काही प्रमाणात प्रेक्षक येतात. आगामी मोसमात पुन्हा एकदा गृहमैदान व बाहेर अशा प्रकारे सामन्यांचे आयोजन होईल, अशी आशा आहे.’तामिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदने खेळपट्ट्यांच्या दर्जाबाबत टीका केली. त्याने स्पर्धेदरम्यान म्हटले होते की, ‘मला ही कल्पना आवडली नाही. गृहमैदानावर खेळणे महत्त्वाचे ठरते.’ (वृत्तसंस्था)>स्थानिक संघांना गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळू नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. कारण यापूर्वी सामने दोन दिवसांमध्ये संपत होते. यावेळी सामने तटस्थ स्थळांवर खेळविण्यात आले, पण गुणवत्तेमध्ये कुठलीच सुधारणा घडली नाही. - रजत भाटिया