शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

‘आॅरेंज आर्मी’ला रोखले

By admin | Updated: April 13, 2017 04:14 IST

आयपीएलच्या दहाव्या सत्रात सलग दोन विजयांसह दणक्यात सुरुवात केलेल्या गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादची विजयी घोडदौड अखेर मुंबई इंडियन्सने रोखली.

- रोहित नाईक,  मुंबई

आयपीएलच्या दहाव्या सत्रात सलग दोन विजयांसह दणक्यात सुरुवात केलेल्या गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादची विजयी घोडदौड अखेर मुंबई इंडियन्सने रोखली. गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर फलंदाजांच्या चमकदार खेळीच्या जोरावर मुंबईने सलग दुसरा विजय मिळवताना हैदराबादचा ४ विकेट्सने पाडाव केला. यासह मुंबईने तीन सामन्यांतून ४ गुणांची कमाई करताना गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादला १५७ धावांवर रोखल्यानंतर मुंबईने विजयी लक्ष्य १८.४ षटकात ६ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. पुन्हा एकदा नितिश राणाने उपयुक्त खेळी करताना ३६ चेंडूत ३ चौकार व २ षटकार ठोकताना ४५ धावांची खेळी केली. सलामीवीर पार्थिव पटेल (२४ चेंडूत ३९) आणि कृणाल पांड्या (२० चेंडूत ३७) यांनीही मोक्याच्यावेळी केलेली फटकेबाजी मुंबईसाठी मोलाची ठरली. त्याचवेळी, पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला. सलग तिसऱ्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाल्याने मुंबईच्या चिंतेत भर पडली आहे. शिवाय जोस बटलर, केरॉन पोलार्ड यांनाही या सामन्यात छाप पाडता आली नाही. मात्र, राणाने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना संघाला विजयी केले. भुवनेश्वर कुमारने ३ बळी घेत मुंबईला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी, सावध पवित्र्यासह सुरुवात केलेल्या हैदराबादने जम बसल्यानंतर समाधानकाराक मजल मारण्यात यश मिळवले. शिखर धवन (४८) - डेव्हिड वॉर्नर (४९) या सलामी जोडीव्यतिरिक्त इतर कोणताही प्रमुख फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला नाही. त्याचवेळी, हे दोघेही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाले. बेन कटिंग्जने अखेरच्या काही षटकात ४ चौकार मारल्याने हैदराबादला दिडशेचा टप्पा ओलांडता आला. जसप्रीत बुमराहने मोक्याच्यावेळी हैदराबादचे ३ फलंदाज बाद करुन त्यांना मर्यादेत रोखण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्याला यावेळी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तसेच, अनुभवी हरभजन सिंगनेही २ बळी घेत चमक दाखवली.लक्षवेधी राशिद...अफगाणिस्तानचा राशिद खान पुन्हा एकदा लक्षवेधी ठरला. त्याने हैदराबादकडून जबरदस्त गोलंदाजी करताना ४ षटकात केवळ १९ धावा देत मुंबईचा कर्णधार रोहितच्या रुपाने महत्त्वाचा बळीही मिळवला. मात्र, इतर गोलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने त्याची झुंज अपयशी ठरली.पंचांचे दुर्लक्ष आणि वॉर्नरचा फायदापहिल्या डावातील पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात म्हणजे सहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर डेव्हीड वॉर्नरने बुमराहला चौकार ठोकला. यानंतर नियमाप्रमाणे पुढील षटकातील पहिला चेंडू शिखर धवनने खेळणे अपेक्षित होते. परंतु, सातव्या षटकातील पहिला चेंडू देखील वॉर्नरनेच खेळला आणि त्यावर एक धाव घेतली. विशेष म्हणजे, पंचांच्या लक्षात ही बाब आली तेव्हा खूप उशीर झाला होता.संक्षिप्त धावफलकसनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १५७ धावा (डेव्हीड वॉर्नर ४९, शिखर धवन ४८, बेन कटिंग्ज २०; जसप्रीत बुमराह ३/२४, हरभजन सिंग २/२३) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १८.४ षटकात ६ बाद १५९ धावा (नितीश राणा ४५, पार्थिव पटेल ३९, कृणाल पांड्या ३७; भुवनेश्वर कुमार ३/२१, राशिद खान १/१९)