शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय खेळाडूंना वैयक्तिक विक्रम नोंदविण्याची संधी

By admin | Updated: August 4, 2015 00:43 IST

भारतीय खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यात वैयक्तिक विक्रम नोंदवण्याची संधी राहील. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत डेरेदाखल झाला आहे.

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यात वैयक्तिक विक्रम नोंदवण्याची संधी राहील. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत डेरेदाखल झाला आहे. डावखुरा सलामीवीर शिखर धवनला मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात एक हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. शिखरने १४ कसोटी सामन्यांत ४१.५० च्या सरासरीने ९९६ धावा फटकावल्या असून, एक हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ चार धावांची गरज आहे. रोहित शर्माला एक हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी या मालिकेत कसून मेहनत घ्यावी लागणार आहे. रोहितने आतापर्यंत ११ कसोटी सामन्यांत ३९.२९ च्या सरासरीने ६६८ धावा फटकावल्या आहेत. त्याला हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ३३२ धावांची गरज आहे. विराट कोहलीने आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील फॉर्म कायम राखला तर तो या मालिकेत तीन हजार धावांचा टप्पा गाठू शकतो. विराटने आॅस्ट्रेलियात शानदार फलंदाजी करताना ७०० धावा फटकावल्या. विराटने ३४ कसोटी सामन्यांत ४५.७३ च्या सरासरीने २५६१ धावा फटकावल्या आहेत. बांगलादेश दौऱ्यात एकमेव कसोटी सामन्याद्वारे भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या आॅफस्पिनर हरभजनसिंगला या दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली तर तो वीरेंद्र सेहवागला (१०३ कसोटी) पिछाडीवर सोडताना सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये नवव्या स्थानावर दाखल होईल. हरभजनने आतापर्यंत १०२ कसोटी सामन्यांत २२०९ धावा फटकावल्या असून, ४१६ बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱ्या जागतिक गोलंदाजांच्या यादीत तो नवव्या स्थानी आहे. हरभजनला शॉन पोलॉकचा (४२१ बळी) विक्रम मोडण्याची संधी आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये हरभजनपेक्षा कपिलदेव (४३४ बळी) आणि अनिल कुंबळे (६१९ बळी) यांनी अधिक फलंदाजांना बाद केले आहे.(वृत्तसंस्था)