शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विविध संयोजन तपासण्याची संधी

By admin | Updated: June 23, 2017 00:46 IST

कागदावर उभय संघांबाबत विचार केला तर निश्चितच भारतीय संघ यजमान संघाच्या तुलनेत बलाढ्य असल्याचे दिसून येते.

सौरव गांगुली लिहितात...पोर्ट आॅफ स्पेनमध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत नव्याने सुरुवात करेल. कागदावर उभय संघांबाबत विचार केला तर निश्चितच भारतीय संघ यजमान संघाच्या तुलनेत बलाढ्य असल्याचे दिसून येते. भारतीय संघ व्यवस्थापन या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेचा उपयोग २०१९ च्या विश्वकप स्पर्धेवर लक्ष केंद्रित करताना युवा व विविध संयोजनाचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील असेल. अशा प्रकारची मालिका ऋषभ पंतसारख्या युवा खेळाडूला जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी पूर्णपणे ‘लाँचिंग पॅड’ ठरू शकते. अजिंक्य रहाणेला चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान राखीव खेळाडूंमध्ये बसावे लागले, पण रोहित शर्माला या दौऱ्यात विश्रांती देण्यात आल्यानंतर रहाणेला वन-डे क्रिकेटमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी आहे. रहाणे कशा प्रकारची खेळी करतो, याबाबत उत्सुकता आहे. रहाणेमध्ये प्रतिभा आहे. वन-डे क्रिकेटमध्ये तो यशस्वीही ठरला आहे. संघात ‘आत-बाहेर’ होण्यासाठी त्याला कुणी दोषी ठरवणार नाही.मोहम्मद शमीही असाच एक खेळाडू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात त्याची निवड करण्यात आली होती. शमी सराव सामन्यात खेळला, पण त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. शमी सामना जिंकून देणारा गोलंदाज आहे. त्याचा योग्यपणे वापर करण्याची गरज आहे. त्याला मालिकेदरम्यान दुखापतीची समस्या भेडसावू शकते, पण त्याला या मालिकेत नैसर्गिक खेळी करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. विंडीज संघाबाबत बोलायचे झाल्यास विश्व क्रिकेटने त्यांना पुनरागमनासाठी सहकार्य करायला हवे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाक संघाच्या यशापासून विंडीज संघाने बोध घ्यायला हवा. ‘पाकिस्तान जर करू शकतो तर आम्हीपण हे करू शकतो’ या सिद्धांतावर त्यांनी वाटचाल करायला हवी. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरलेल्या संघाने आता चमकदार कामगिरी करायला हवी. कॅरेबियन संघाचा इतिहास गौरवशाली आहे. विंडीजने क्रिकेटला अनेक महान खेळाडू दिले आहे. वर्षभरापूर्वी वेस्ट इंडिजचा अंडर-१९ संघ आणि पुरुष व महिला संघही टी-२० मध्ये अव्वल स्थानावर होते. वर्षभरापूर्वी विंडीजने दोनदा टी-२० लढतींमध्ये भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यामुळे विंडीजमध्ये प्रतिभांची उणीव नाही. त्यांना केवळ अनुभवी व युवा खेळाडूंदरम्यान ताळमेळ साधण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना भारताच्या आव्हानाला सामोरे जाण्यास मदत मिळेल. (गेमप्लॅन)